शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तिरुच्या पुलावर झाडे, झुडपे वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावाजवळून वाहणाऱ्या तिरू नदीपात्रात झुडपे वाढली आहेत. त्याचबराेबर नदीवरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावाजवळून वाहणाऱ्या तिरू नदीपात्रात झुडपे वाढली आहेत. त्याचबराेबर नदीवरील पुलावरही झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे. संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हाळी हंडरगुळी गावाजवळून तिरू नदी वाहते. पुढे ती चिमाचीवाडी येथे असलेल्या तिरू प्रकल्पाला जाऊन मिळते. या नदीचा परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होत असून, सिंचनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यास मदत झाली आहे. हाळी गावाजवळून वाहणाऱ्या या नदीवर वाहतुकीच्या सोयीसाठी निजाम काळात बांधलेला पूल आजही तग धरून आहे.

१० वर्षांपूर्वी या पुलाची एक बाजू वाढविण्यात आली. मात्र, जुन्या बाजूवर मागील काही वर्षांपासून लिंब, पिंपळ, वड, बोर आदी झुडपे वाढली होती. त्याची वेळेत दखल न घेतल्याने आज त्या झुडपांचे झाडात रूपांतर होत आहे. त्यामुळे झुडुपांची मुळे खोलवर जाऊन पुलाला तडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीच्या पुलावरून नांदेड - बिदर राज्यमार्ग असल्याने एस. टी. बसेस, ट्रक, अवजड वाहने, मालवाहतुकीची वाहने, चारचाकी, दुचाकी आदी वाहनांची सतत वर्दळ असते. शिवाय, हाळी हंडरगुळी हे बाजाराचे गाव असल्याने सतत वाहनांची वर्दळ असते. संबंधित विभागाने पुलाच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.