शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणा पंधरवडा अंतर्गत शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST

सीईओ अभिनव गोयल यांचा सत्कार लातूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांचा बहुजन शिक्षक संसदेचे जिल्हाध्यक्ष ...

सीईओ अभिनव गोयल यांचा सत्कार

लातूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांचा बहुजन शिक्षक संसदेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सदस्य मंगेश सुवर्णकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत तत्काळ निर्णय घेणार असल्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी दिले. यावेळी शिक्षक समितीचे राज्य संपर्कप्रमुख शिवाजीराव साखरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

लातूर : शहरातील लोकमान्य टिळक विचार मंचच्यावतीने लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, ॲड. शैलेश गोजमगुंडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, नगरसेविका वर्षा कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने, पंडित रघुत्तम आचार्य जोशी, आचार्य पाटील, बाळासाहेब देशपांडे, संजय निलेगावकर, हरिराम कुलकर्णी, डॉ. श्रीनिवास संदीकर, शेषराव कुलकर्णी, धनंजय बोरगावकर, ॲड. नरेंद्र कुलकर्णी, माधवराव कुलकर्णी, माधव कुलकर्णी, प्रा. भुजंग देशपांडे, ॲड. राहुल मातोळकर, दगडू मिटकरी, भानुदास भातंब्रेकर, गोपाळ जेवलीकर, कुलदीप कुलकर्णी, दिवान, दीपक कोटलवार, ॲड. गजानन चाकूरकर आदी उपस्थित होते.

पोहरेगावात वृक्षारोपण, गुणवंतांचा सत्कार

लातूर : रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथे मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात आली तसेच दहावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच गंगासिंह कदम, सीआरपीएफचे डीआयजी संजीवकुमार, नूरअली सय्यद, सभापती रमेशराव सोनवणे, ऋतुजा मोरे, अध्यक्ष रामराम मोरे, उद्धवराव यादव, रामराव सरवदे, सदानंद शिंदे, ॲड. दशरथ सरवदे, ॲड. शिरीष यादव, अंकुश शिंदे, माणिकराव शिंदे, चंद्रकांत पाचेगावकर, विनायकराव सरवदे, संतोष लोखंडे, हनुमंत केसरे, शाहुराव हांडगे, सुभाष वाघ, गणपत केसरे, विशालराव मोरे, बाळकृष्ण मोरे, पांडुरंग सरवदे, उत्तम शिंदे, कमलाकर मोरे, शंकरराव राठोड, बळीराम हांडगे, संदीप वाघ, विकास सरवदे, लालासाहेब मोरे, गोविंद धावारे, संतोष गायकवाड, समाधान गायकवाड, किशोर राठोड, संतोष शिंदे, रामदास कदम, रामराम यादव, सुरेश वेदपाठक, सुधीर सातापुरे, डी. आर. कांगणे, जगन्नाथ मोरे आदी उपस्थित होते.

विजय टाकेकर यांना कोरोना योद्धा पुरस्कार

लातूर : येथील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते विजय टाकेकर यांना कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट मिशन यांच्यावतीने राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मुख्य लेखाधिकारी जवळगेकर, पूजा निचळे, संजय क्षीरसागर, विक्रम टाकेकर आदी उपस्थित होते. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिक्षण सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे यांचा सत्कार

लातूर : नव्याने रूजू झालेले सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे यांचा मराठी समाजशास्त्र परिषदेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायण कांबळे, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्रा. डॉ. अंजली जोशी, प्रा. डॉ. वेदप्रकाश मलवाडे, डॉ. रामचंद्र भिसे, डॉ. अशोक वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी मराठी समाजशास्त्र परिषदेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

एस. टी.च्या मालवाहतुकीला मिळतोय प्रतिसाद

लातूर : राज्य परिवहन महामंडळाकडून मालवाहतूक सेवा सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाला व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर आगारांकडून स्वतंत्र मालवाहतूक गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह परजिल्ह्यातही वाहतूक होत असून, यामुळे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत आहे. दरम्यान, मागणीनुसार तत्काळ मालवाहतूक गाडीचे नियोजन करण्यात येत असल्याचे लातूर विभागाकडून सांगण्यात आले.