शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

३ कोटींच्या थकीत वसुलीसाठी वाहतूक शाखा ॲक्टिव्ह मोडवर; पाच महिन्यांत १ कोटी ७० लाख वसूल

By आशपाक पठाण | Updated: June 19, 2023 17:51 IST

मागील दीड वर्षात १ लाख १६ हजार वाहनधारकांकडे जवळपास ३ कोटी रुपये दंड थकीत आहे.

लातूर : वाहतूक कोंडी रोखण्याचे काम करणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या पथकाने वसुलीवरही विशेष भर दिला आहे. मागील पाच महिन्यांत विविध दंडाची थकबाकी असलेली वाहने टार्गेट करून तपासणी केली जात आहे. त्यानुसार पाच महिन्यांत एक दोन नव्हे तर तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची वसुली लातूर शहर वाहतूक शाखेने केली आहे. मागील दीड वर्षात १ लाख १६ हजार वाहनधारकांकडे जवळपास ३ कोटी रुपये दंड थकीत आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढले आहे. एकदा ऑनलाइन दंड नावावर पडला की, पुन्हा शहरात यायचे नाही किंवा दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करायची. हजारो वाहनधारकांकडे थकीत असलेली रक्कम कोट्यवधींची आहे. एकदा खटला दिला की, एक तर तो निकाली काढावा लागतो किंवा दंडाची रक्कम वसुली करावी लागते. यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेच्या पथकाकडून वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच दंडात्मक कारवाईवर भर दिला जात आहे. वाहतूक शाखेच्या विशेष पथकाकडून वाहन तपासणीत थकीत दंड असलेल्या वाहनांकडून सक्तीचे वसुली केली जात असल्याचे सांगण्यात आले.

दंड कशाचा, कधी भरायचा...वाहन परवाना नाही, फिटनेस, पीयूसी, इन्सुरन्स, सिग्नल तोडले आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ लाख १६ हजार वाहनधारकांना ऑनलाइन दंड देण्यात आला आहे. यात दररोज शहरात येणारी किंवा व्यावसायिक वाहने दंडाची रक्कम भरून घेतात. दंड भरण्यात दुचाकीचालक दुर्लक्ष करतात. दीड वर्षात तब्बल ३ कोटींची दंडाची रक्कम वसूल होणे बाकी आहे. त्यामुळे वाहतूक शाखेच्या पथकाकडून वाहन तपासणीत थकबाकी आढळून आलेली वाहने शोधली जात आहेत.

ई-चलन मशीनचा वापर...लातूर शहर वाहतूक शाखेच्या पथकाकडून ई- चलन मशीनद्वारे वाहनाचा क्रमांक टाकून त्याची माहिती काढली जात आहे. दंडाची रक्कम थकीत असल्याचे आढळून आल्यास त्याच्याकडून वसुली केली जात आहे. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कदम, पोलिस उपनिरीक्षक आवेज काझी, पोलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या पथकाने पाच महिन्यांत १ कोटी ७० लाख रुपयांची थकीत दंडाची रक्कम वसूल केली आहे.

विस्कळीत वाहतुकीकडेही लक्ष हवे...लातूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन रेणापूर नाका, राजीव गांधी चौक, गंजगोलाई, बार्शी रोडवर पाच नंबर चौक याठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची आहे. सकाळी व सायंकाळी किमान तीन ते चार तास याठिकाणी वाहतूक पोलिस तत्पर असायला हवेत. तेही प्रत्येक चौकात किमान ४ तरी पोलिस हवेत. त्याशिवाय कोंडी हटणार नाही. वसुलीबरोबर सुरळीत वाहतुकीला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीसlaturलातूर