शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

उदगीरच्या मार्केटयार्डसाठी ५० एकर जागा मिळवून देणार; दिलीपराव देशमुख यांची ग्वाही

By संदीप शिंदे | Updated: August 10, 2023 19:29 IST

उदगीर येथे शेतकरी, हमाल, मापाडी व नूतन संचालकांच्या वतीने आयोजित स्नेह व ऋणनिर्देश मेळाव्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते.

उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत चालणाऱ्या मार्केटयार्डसाठी आगामी काळात ५० एकर जमीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बुधवारी येथे दिली.

उदगीर येथे शेतकरी, हमाल, मापाडी व नूतन संचालकांच्या वतीने आयोजित स्नेह व ऋणनिर्देश मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री आ. अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख, माजी आ. त्र्यंबक भिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, ‘रेणा’चे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई भोसले, ॲड. प्रमोद जाधव, रवींद्र काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी मुळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, उषाताई कांबळे, सभापती शिवाजी हुडे, उपसभापती प्रीती भोसले, मंजूरखाँ पठाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, मारोती पांडे आदींसह संचालक उपस्थित होते. 

माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, देशाची प्रगती काँग्रेस पक्षाने केली. लोकशाही जिवंत ठेवण्याचे कार्य काँग्रेसने केली असून, ते जपायची जबाबदारी तुम्हा-आम्हावर आली आहे. सध्याचे वातावरण पाहता नागरिकांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला तरच लोकशाही अस्तित्वात राहील, असेही ते म्हणाले. यावेळी बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या घरी जन्मास येणाऱ्या मुलीच्या नावाने राष्ट्रीय बँकेत पाच हजार रुपयांची ठेव मुलीच्या १८ वर्षांपर्यंत ठेवण्यासाठी वैशालीताई देशमुख बालिका बचाव योजना मान्यवरांच्या हस्ते सुुरू करण्यात आली. प्रास्ताविकात सभापती शिवाजी हुडे यांनी बाजार समितीकडून १ हजार ८९७ जणांना लाभ दिल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. गोविंद भालेराव व संचालक ॲड. पद्माकर उगिले यांनी केले. आभार संचालक मधुकर एकुर्केकर यांनी मानले.

लोकशाहीत इमान राखणे गरजेचे...आज राज्यात विचारांशी एकनिष्ठ नसलेला महाराष्ट्र दिसत आहे. मतदाराला गृहीत धरून विचारांना सोडचिठ्ठी देण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून होत आहे. लोकशाहीत लोकांशी इमान राखणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाने सामान्य माणसांशी असलेली बांधिलकी जपली आहे. उदगीर व जळकोट तालुक्यांत महाविकास आघाडी विचाराचा आजही मतदार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून बहुमत मिळवावे, असेही माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले.

कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर काम करावे...काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर काम करीत राहावे. त्यामुळे सामान्य जनतेशी, पक्षांच्या विचारांची नाळ कायम राहते. सर्वसामान्यांच्या विकासासाठी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काँग्रेस पक्षाचे फार मोठे योगदान आहे. जिल्हा बँक, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याचे काम झाले असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख म्हणाले.

टॅग्स :laturलातूरDilip Deshmukhदिलीप देशमुख