अरुण बाबुराव माने (४५), गीता अरुण माने (३६) व मुलगा मुकुंद अरुण माने (१५, रा. लक्ष्मी कॉलनी, शिवाजी शाळेसमोर, खाडगाव रोड, लातूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अरुण माने हे पत्नी आणि दोन मुलांसमवेत पुण्याला काही खासगी कामानिमित्त गेले होते. दरम्यान, तेथील काम झाल्यानंतर ते लातूरला रविवारी रात्री आपल्या कार (एमएच २४, एटी २००४) ने परतत होेते. ते इंदापूर तालुक्यातील डाळज नं. २ जवळ पोहोचले असता ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा आणि त्यांच्या कारचा अपघात झाला. यात गीता माने आणि मुलगा मुकुंद माने हे जागीच ठार झाले, तर अरुण माने यांना उपचारासाठी नेण्यात येत असताना मृत्यू झाला. या अपघातात मुलगी साक्षी अरुण माने आणि चालक महादेव नेटके हे जखमी झाले आहेत. साक्षीवर पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मृत अरुण माने, गीता माने, मुकुंद माने यांच्यावर शोकाकुल वातावरणात सोमवारी दुपारी लातुरातील खाडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत अरुण माने हे लातुरातील टायरचे मोठे व्यावसायिक होेते. शासकीय गुत्तेदार दिलीप माने यांचे ते चुलत बंधू होते.
फोटो : १. ०८अरुण माने
२. ०८गीता माने
३. ०८मुकुंद माने
एफटीपीने पाठविले आहेत.