शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्याचे ९ लाख रुपये लुटणारे निघाले शेजारीच; तिघे अटकेत

By हरी मोकाशे | Updated: February 27, 2023 17:29 IST

तीन ठिकाणांहून पकडले चोरट्यांना; देवणी पोलिसांची कारवाई

देवणी (जि. लातूर) : देवणीतील एका व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून ९ लाख लुटल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणातील तिघा चोरट्यांना देवणी पोलिसांनी सोमवारी पहाटे जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे, हे आरोपी व्यापाऱ्याच्या घराशेजालीच निघाले आहेत.

पोलिसांनी सांगितले, देवणीतील कापड व्यापारी उमाकांत जगदीश जीवने यांनी गुरुवारी रात्री व्यवहारामुळे जमा झालेले ९ लाख ५ हजार रुपये जमा करुन ते बॅगेत ठेवले आणि नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केले. त्यानंतर ते बसस्थानकाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या घराकडे पायी निघाले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून रोख रकमेची बॅग पळविली होती. याप्रकरणी शुक्रवारी देवणी पोलिस ठाण्यात दोघा अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी आरोपींच्या शोधासाठी तीन पथक तयार केली. या पथकाकडून आणि पोलिस विभागाच्या सायबर क्राईम विभागाकडून तपास सुरु होता. दरम्यान, सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांचा ठावठिकाणा लागला आणि पोलिसांनी तिघांना जेरबंद केले. या तपास मोहिमेसाठी पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, पोहेकॉ. विनायक कांबळे, सुग्रीव कोंडामंगले, गणेश बुजारे, नरेश उस्तरगे, बालाजी शिंदे, श्रीराम आगलावे, अभिजीत डोईजड, संजय सावरगावे यांनी परिश्रम घेतले.

तीन ठिकाणांहून पकडले चोरट्यांना...लूट प्रकरणात आकाश राजकुमार सूर्यवंशी (रा. देवणी), प्रशांत बालाजी सूर्यवंशी (रा. अंबानगर, हमु. देवणी) व दिलीप हनुमंत दासरी (रा. देवणी) या तीन आरोपींना देवणी पोलिसांनी पकडले आहे. विशेष म्हणजे, हे तिन्ही आरोपी देवणी, लातूर, निलंगा अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी होते. तेथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. हे तिन्ही आरोपी व्यापाऱ्याच्या घराशेजारील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन लाखाच्या रकमेसह दुचाकी जप्त...या चोरी प्रकरणातील आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून २ लाख १० हजारांची रक्कम, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर