लातूर : शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गावर माेबाईलवर बाेलणाऱ्या वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये ३ हजार १२६, तर जानेवारी ते जुलै २०२१ अखेर १ हजार ३७६ वाहनधारकांना माेबाईलवर बाेलल्याप्रकरणी तब्बल ९ लाख ४०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
ब्रेथ ॲनालायझरवरील धूळ काही हटता हटेना...
लातूर शहर वाहतूक शाखेकडे असलेल्या ब्रेथ अनालायझरवरील धूळ काही हटता हटत नसल्याने बेशिस्त आणि मद्यपी वाहनधारकांचे प्रमाण वाढले आहे. यातून माेठ्या प्रमाणावर अपघाताच्या घटना घडत आहेत. ब्रेथ ॲनालायझरच्या माध्यमातून मद्यपी आणि भरधाव वाहनधारकांवर कारवाई करणे अधिक सुलभ हाेते. तातडीने तपासणी करून दंड करता येताे. मात्र, या यंत्रणेचा वापर अलीकडे फारसा हाेताना दिसून येत नाही.
हेल्मेट नसल्याने गेला ४४ जणांचा बळी...
१ लातूर-नांदेड महामार्गावर माेठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे.
२ केवळ वाहन चालविताना केलेला निष्काळजीपणा आणि हेल्मेट न वापरल्याने गत दीड वर्षात ४४ वाहनधारकांचा बळी गेला आहे.
३ लातूर-बीदर आणि नांदेड-बीदर मार्गावरही गत दीड वर्षभरात अपघातांच्या घटना घडल्या आहेत. याही मार्गावर हेल्मेट न घातल्याने अनेकांचा बळी गेला.