शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट!

By हरी मोकाशे | Updated: July 29, 2024 18:57 IST

यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट!

लातूर : यंदा मृगाने दमदार बरसात केल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीप पेरण्यांना प्रारंभ झाला. वरुणराजाचे वेळेवर आगमन झाल्याने जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा उडीद, मुगाचा पेरा वाढला आहे तर पांढरे सोने असलेल्या कापसाची लागवड दुप्पट झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९९.९९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात यंदा खरीपाचा ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर पेरा होईल, असा अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यादृष्टीने बी- बियाणे, खतांचे नियोजन केले होते. दरम्यान, मान्सूनअगोदरच रोहिण्या चांगल्या बरसल्या होत्या. तद्नंतर मृगानेही वेळेवर दमदार वर्षाव केला. तीव्र उन्हामुळे होरपळून निघालेल्या नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून बळीराजाने चाढ्यावर मूठ धरण्यास सुरुवात केली. पेरणीनंतर पिकांसाठी योग्य पाऊस झाल्याने खरीप पिके बहरली आहेत. सध्या आंतरमशागतीस वेग आला आहे.

यंदाची पेरा (हेक्टर)...सोयाबीन - ४९०९०६तूर - ७१४७५मूग - ७१४१उडीद - ५९४४कापूस - १६२३८

सन २०२३ मध्ये पेरा (हेक्टर)...सोयाबीन - ५४८१७०तूर - ६४३९६मूग - ४४४९उडीद - २९७०कापूस - ७५३५सन २०२२ मध्ये पेरा (हेक्टर)...सोयाबीन - ४८९७५२तूर - ६८८८८मूग - ६०७६उडीद - ४०१९कापूस - ६१९१

जिल्ह्यात आतापर्यंत ४५१.५ मिमी पाऊस...लातूर - ४५७.०औसा - ४६१.१अहमदपूर - ५३५.९निलंगा - ४३४.७उदगीर - ३९९.६चाकूर - ४७२.५रेणापूर - ५४८.९देवणी - ३५०.३शिरुर अनं. - ३६४.१जळकोट - ४०८.२

सोयाबीनच्या क्षेत्रात ५७ हजार हेक्टरची घट...गेल्या दोन वर्षांपासून बाजारपेठेत सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. आगामी काळात चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी अन्य पिकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ५७ हजार हेक्टर क्षेत्राची घट झाल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत ९९.९९ टक्के पेरणी...जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ९९.९९ टक्के खरीपाची पेरणी झाली आहे. लातूर तालुक्यात १०९.७८, औसा - १०९.१९, अहमदपूर- ९४.६, निलंगा - ८९.४४, शिरुर अनं. - ९४.३४, उदगीर- ९९.१२, चाकूर - १०२.१७, रेणापूर -९९.१२, देवणी - ९६.६३, जळकोट -१०३.८९ टक्के पेरणी झाली आहे.

वेळेवर पाऊस, लवकर पेरणी...गेल्या दोन वर्षांत उशीरा पाऊस झाल्याने खरीप पेरण्याही विलंबाने झाल्या. त्यामुळे उडीद, मुगाचा पेरा घटला होता. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पेरण्याही लवकर सुरु झाल्या. परिणामी, तूर, उडीद, मुगाचे क्षेत्र वाढले आहे. काही शेतकऱ्यांनी कपाशीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे यंदा कापसाची लागवड वाढली आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी