शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत विचार अन् तत्त्वाच्या राजकारणापासून फारकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 20:23 IST

अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्याशी संवाद

लातूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्य उद्देश बाजूला राहत आहे. विचार आणि तत्त्वाच्या राजकारणाला बगल देत मुद्याऐवजी गुद्याचे राजकारण केले जात आहे. प्रबोधनाऐवजी एकमेकांवर चिखलफेकच प्रचारात दिसून येत आहे. मागच्या पाच वर्षांत काय केलं आणि पुढे काय करणार या मुद्यांवर निवडणुकीत चर्चा होताना दिसत नाही. व्यक्तिगत पातळीवर आरोप-प्रत्यारोप करणे आणि मतदारांचे मनोरंजन करणे हाच अजेंडा दिसतोय. असे परखड मत अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी त्यांच्याशी केलेल्या संवादात व्यक्त केले.

व्यसनविरोधी कायदा अद्याप प्रलंबित

विचार, तत्त्वाच्या राजकारणाची मांडणी उमेदवारांकडून होत नाही. लोकशाहीसाठी उमेदवारांचे हे तंत्र अडथळा ठरेल.केजी टू पीजीपर्यंत मोफत शिक्षण. आम जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी विमा कवच. या मुद्यांवर तर कोणी बोलतच नाही. तरुणांना रोजगाराची हमी, शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण योजना घेऊन कोणताही उमेदवार समोर आलेला दिसत नाही. प्रस्तुत मुद्दे महत्त्वाचे असताना त्याला कोणी हात घालत नाही. व्यसनविरोधी कायदा अंनिसच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला, पण अंमलबजावणी होत नाही, हे मुद्देही राजकीय पक्ष विसरलेले आहेत. 

लोकशाही आणि संविधान मूल्यांची जपणूक व्हावी

स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही लोकशाहीची मूल्ये आहेत. परंतु, हल्ली विचार स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होतोय की काय, असे वाटते आहे. निर्भीडपणे विचार मांडता यावा, याचे स्वातंत्र्य आपल्या लोकशाही राज्यामध्ये आहे. लोकशाही संवर्धनासाठी केवळ राजकीय पक्षांकडून गप्पा मारल्या जातात. वास्तवात प्रयत्न होताना दिसत नाहीत. लोकशाही आणि संविधान मूल्यांना जपणे राजकीय पक्षांबरोबर नागरिकांचे कर्तव्य आहे.नवमतदारांनी सद्सद्विवेक जागृत ठेवून मतदान करावे, जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल. विकासाचे धोरण आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणाऱ्यांना बळ द्यावे.

टॅग्स :laturलातूरElectionनिवडणूकPoliticsराजकारण