शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

थेरगाव शोकाकुल; शहीद जवान सूर्यकांत तेलंगे यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:48 IST

पठाणकोट येथील सीमेवर झालेल्या चकमकीत ते सोमवारी शहीद झाले.

थेरगाव (जि. लातूर) : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथील भारतीय सैन्य दलातील जवान सूर्यकांत शेषेराव तेलंगे हे पठाणकोट येथील सीमेवर कर्तव्य बजावताना झालेल्या चकमकीत सोमवारी पहाटे शहीद झाले. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. शहीद जवान तेलंगे पार्थिव बुधवारी दुपारी थेरगावात पोहोचणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

थेरगाव येथील शेतकरी कुटुंबातील जवान सूर्यकांत शेषेराव तेलंगे (३५) हे सन २००७ मध्ये भारतीय सैन्यातील ब्रिगेड ऑफ दि गार्डस रेजिमेंटमधील १५ गार्डस बटालियनमध्ये रुजू झाले होते. ते सध्या सैनिक हवालदार म्हणून कार्यरत होते. पठाणकोट येथील सीमेवर झालेल्या चकमकीत ते सोमवारी शहीद झाले. ही माहिती समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मंगळवारीही गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने गावात दुखवटा होता.

शहीद जवान तेलंगे यांचे पार्थिव मंगळवारी अमृतसर येथून विमानाने निघाले आहे. बुधवारी पहाटे पुणे येथे पोहोचणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, शिरूर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जटाळे, मंडळ अधिकारी कुलकर्णी, तलाठी कैलास कुरुडे, पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे, सय्यद, विकास अर्जुने, येडले यांनी गावात येऊन अंत्यविधीसाठीच्या जागेची पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक परमेश्वर शिरुरे, उपसरपंच सुनील पाटील आदी उपस्थित होते.

प्रेमनाथ विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शन...शहीद जवान तेलंगे यांचे पार्थिव गावात आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी गावातील श्री प्रेमनाथ विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अतुल जटाळे यांनी दिली. प्रशासनाने अंत्यसंस्कारासाठी जागेची पाहणी केल्यानंतर तिथे स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली. तेव्हा गावातील नागरिकांसह श्री प्रेमनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या जड अंत:करणाने मदत करण्यास सुरुवात केली. यावेळी शहीद जवान सूर्यकांत तेलंगे अमर रहे, अशा घोषणा देण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. तेव्हा गावातील प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.

टॅग्स :laturलातूरMartyrशहीदIndian Armyभारतीय जवान