काेराेनाच्या पहिल्या लाटेत शिक्षकांवर काेराेना कक्षासह अन्य जबाबदाऱ्या साेपविण्यात आल्या हाेत्या. ही लाट ओसरत नाही तोच दुसरी लाट आली. पूर्वीच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र आहे. बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे; तसेच मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. ही लाट थाेपविण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययाेजना राबविल्या जात आहेत. याहीवेळी शिक्षकांकडे काही जबाबदाऱ्याही दिल्या आहेत. दिलेल्या जबाबदाऱ्या शिक्षक निभावत आहेत. आजघडीला जिल्ह्यातील ९८१ शिक्षक या कामात आहेत. असे असतानाही त्यांना विमा संरक्षण देण्याची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याचे मागील काही घटनांवरून समाेर आले. काेराेनाच्या लाटेत कर्तव्य बजावताना सहा शिक्षकांना प्राण गमवावे लागले. या शिक्षकांना ५० लाखांचा विमा मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. चार ते पाच महिन्यांचा कालावधी लाेटूनही संबंधित शिक्षकांच्या कुटुंबीयांना विमा रक्कम मिळालेली नाही. शिक्षण विभागाकडून पाठपुरावाही करण्यात येत असला तरी शिक्षकांच्या कुटुंबाना विमा रक्कम मिळालेली नाही. परिणामी, सेवा बजावणाऱ्या शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
शिक्षणाधिकारी यांचा कोट...
काेराेना महामारीचे संकट थाेपविण्यासाठी शिक्षकांनाही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. संबंधित शिक्षक ठरवून दिलेली कामे करीत आहेत. या काळात कर्तव्य बजावताना सहा शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना ५० लाखांचा विमा मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
-विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.