अहमदपुरात मोबाईलची चोरी; गुन्हा दाखल
लातूर : अहमदपूर शहरातून मोबाईल चोरीला गेल्याची घटना २९ डिसेंबर २०२० रोजी घडली. या प्रकरणी फिर्यादी सिद्धार्थकुमार दिगंबरराव सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमांविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. माने करीत आहेत. सदरील चोरीला गेलेला मोबाईल अहमदपूर नगर परिषद परिसरातून चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शिवीगाळ करून मारहाण; गुन्हा दाखल
लातूर : कामावर असताना फोन मागितला, तेव्हा फिर्यादीने आता मी देऊ शकत नाही, काम आहे असे सांगितले असता शिवीगाळ करीत हातातील कत्तीने वार करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी आकाश अशोक आदमाने यांच्या तक्रारीवरून आकाश रमेश कांबळे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोफौ. राठोड करीत आहेत.
श्री व्यंकटेश विद्यालयात कार्यक्रम
लातूर : येथील श्री व्यंकटेश शिक्षण संस्थेत कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्याध्यापक आर.बी. देशमुख, सूर्यकांत पटणे, प्रशांत पटणे, पी.एन. कुलकर्णी, आर.डी.बरचे, डी.एस. राठोडकर, श्रीकांत बिडवे, प्रा. माधुरी पाटील, व्ही.सी. स्वामी, आर.ए. होनराव, सी.व्ही. मेटे, एम.व्ही. वावरे आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती.
एमआयडीसीतील पथदिवे सुरू करावेत
लातूर : एमआयडीसी परिसरातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळी रस्त्यावर अंधार पसरत आहे. वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यातच एमआयडीसीत अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. एमआयडीसी प्रशासनाने बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
उड्डाण पुलावरील खड्डे बुजवावेत
लातूर : बारा नंबर पाटी तसेच शहरातील उड्डाण पूल रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी चालकांना कसरत करावी लागते. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.