शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

महाराष्ट्रव्यापी नाट्य जागर; शंभरावे नाट्यसंमेलन लातुरात रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 12:19 IST

लातुरात प्रथमच नाट्यसंमेलन होत असून त्याचे आयोजन नाट्यपरिषदेची लातूर महानगर शाखा करीत आहे.

ठळक मुद्दे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची माहितीमुंबईत होणार समारोप

लातूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने यंदा लातुरात ४ ते १० मे या कालावधीत १०० वे नाट्यसंमेलन होणार आहे़ यानिमित्त महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांत नाट्य जागर होणार आहे़  मराठी नाटक आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा नाट्य परिषदेचा मानस असल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, कार्यवाह शरद पोंक्षे यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत दिली़

प्रसाद कांबळी म्हणाले,  लातुरात प्रथमच नाट्यसंमेलन होत असून त्याचे आयोजन नाट्यपरिषदेची लातूर महानगर शाखा करीत आहे. ४ ते १० मे या कालावधीत लातूर शहरासह उदगीर, अहमदपूर आणि निलंगा या तालुक्यांच्या ठिकाणी ४ दिवस नाट्यजागर होईल. यात नामवंत कलावंतांचा सहभाग असेल़ यात चार व्यावसायिक नाटके सादर होतील. ८ मे रोजी लातूर शहरातून नाट्यदिंडी काढून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होईल. ९ मे रोजी स्थानिक नाट्य कलावंतांच्या विविध नाट्यकला प्रकारांचे सादरीकरण होईल. १० मे रोजी मध्यवर्तीकडून येणारे विविध नाटके, दिर्घांक एकांकिका, नाट्यरजनी या विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र होईल़. नाट्यसंमेलनास महाराष्ट्रातील किमान २०० नाट्य कलावंत तथा रंगकर्मी हजेरी लावणार आहेत़ पत्रपरिषदेला लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड़ शैलेश गोजमगुंडे, दिगंबर प्रभू आदींची उपस्थिती होती.

मुंबईत होणार समारोपशंभराव्या नाट्य संमेलनाचा जागर २७ मार्चपासून सांगली येथून सुरू होईल़  महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांत नाट्यजागर पोहोचेल़ त्यानंतर ४ ते १० मे या कालावधीत लातूर येथे हे संमेलन होईल़ संमेलनाचा समारोप मुंबई येथे होईल, अशी माहिती प्रसाद कांबळी, सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांनी दिली़ 

टॅग्स :laturलातूरMaharashtraमहाराष्ट्रSharad Ponksheशरद पोंक्षे