शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर स्फाेट दुर्घटनेतील शेवटच्या क्षणाचा थरार..? रामा यांनी सिलिंडर कवटाळले अन् मुलांना पळायला सांगितले..! 

By राजकुमार जोंधळे | Updated: October 17, 2023 05:38 IST

या घटनेतील ११ पैकी एक जण बरा झाला असून, साेमवारी सुट्टी मिळाली.

लातूर : फुग्यात हवा भरताना झालेल्या सिलिंडर स्फाेटाच्या दुर्घटनेचा थरार काही जणांनी पाहिला हाेता. रामा नामदेव इंगळे हे मुलांना फुग्यामध्ये हवा भरून देत हाेते. त्यांना सिलिंडर लिकेज अथवा काहीतरी गडबड लक्षात आली असावी, त्यामुळे त्यांनी स्फाेट हाेण्यापूर्वी मुलांना पळा..पळा..असे ओरडून सांगितले अन् शेवटच्या क्षणी सिलिंडर कवटाळले. अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. असे सूत्रांनी सांगितले.  

दरम्यान, या घटनेतील ११ पैकी एक जण बरा झाला असून, साेमवारी सुट्टी मिळाली. उर्वरित दहापैकी आठ जणांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून, दाेघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गंभीर असलेला एकजण खासगीत तर एकजण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे. इस्लामपुरा, तावरजा काॅलनी परिसरातील ही घटना रविवारी सायंकाळी घडली हाेती.

बीड जिल्ह्यातील वाघाळा राडी (ता. आंबाजाेगाई) येथील रहिवासी रामा नामदेव इंगळे (वय ५०) हे लातुरातील इस्लामपुरा, तावरजा काॅलनी परिसरात फुगे विक्रीसाठी आले हाेते. दरम्यान, फुग्यामध्ये गॅस सिलिंडरच्या माध्यमातून हवा भरत असताना, त्यांच्या आजूबाजूला मुलांचा घाेळका जमला हाेता. यावेळी अचानकपणे गॅस सिलिंडरचा स्फाेट झाल्याने ते स्वत: रामा इंगळे ठार झाले तर ११ मुले जखमी झाले. दरम्यान, याप्रकरणी विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात फुगेविक्रेत्याविराेधात साेमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी सांगितले.

दाेन जखमी मुले अतिदक्षता विभागात...११ जखमींपैकी ९ जणांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हाेते. यातील एकाला साेमवारी दुपारी सुट्टी देण्यात आली. तर एक जण ७० टक्के भाजल्याने गंभीर आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर जनरल वार्डात उपचार सुरू आहेत. - डाॅ. शैलेंद्र चव्हाण, प्रभारी अधिष्ठाता, लातूर

टॅग्स :Blastस्फोट