शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या तिकडीने क्रीडा महोत्सव सोडली छाप ! व्हॉलीबॉलमध्ये विद्यापीठास मिळवून दिले सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 18:34 IST

प्रल्हाद, शोएब, मारुती यांच्या खेळीने सुवर्णकिमया

- महेश पाळणेलातूर : उत्कृष्ट अष्टपैलू खेळी व स्मॅशचा जोरदार हल्ला चढवित लातूरच्या त्रिकुटांनी औरंगाबाद येथे झालेल्या क्रीडा महोत्सवात छाप सोडत आपल्या विद्यापीठास सुवर्णपदक पटकावून दिले. व्हॉलीबॉल खेळात लातूरचा नेहमीच दबदबा असतो. ही लय कायम ठेवत लातूरच्या प्रल्हाद सोमवंशी, शोएब शेख व मारुती हासुळे यांनी सुवर्णकिमया साधली.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून क्रीडा महोत्सव सुरु होता. या स्पर्धेत लातूरच्या महाराष्ट्र क्लबचा खेळाडू प्रल्हाद सोमवंशी हा यजमान औरंगाबाद विद्यापीठाचा कर्णधार होता. या सोबतच फ्रेंडस क्लब लातूरचा शोएब शेख व वाढवण्याच्या यशवंत क्लबचा मारोती हासुळे या तिघांनी जाेरदार खेळांचे प्रदर्शन करीत संघास विजेतेपद मिळवून दिले. यापुर्वीही लातूरच्या व्हॉलीबॉल पटूंनी नांदेड व औरंगाबाद येथील विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आपल्या संघास यश मिळवून दिले आहे. कोरोनानंतर झालेल्या या स्पर्धेत आपला दबादबा कायम ठेवला आहे. या खेळीचे व्हॉलीबॉल क्षेत्रातून कौतूक होत आहे.

नागपूर-मुंबई विद्यापीठावर मात...अंतिम सामन्यात या तिघांच्या खेळीच्या जोरावर यजमान औरंगाबाद विद्यापीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपुरचा ३-१ ने पराभव केला. तत्पुर्वी उपांत्य सामन्यात मुंबई विद्यापीठाचा ३-० असा एकतर्फी धुव्वा उडविला. सुरुवातीच्या लिग सामन्यात कृषी विद्यापीठ दापोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या संघाचा पराभव केला.

अष्टपैलू, स्मॅश हीट कामगिरी...कर्णधार असलेल्या प्रल्हाद सोमवंशीने अष्टपैलू खेळी करीत संघास आघाडी मिळवून दिली. यासह काऊंटर अटॅकर म्हणून खेळणाऱ्या शोएब शेख व मारोती हासोळे यांनी प्रतिस्पर्ध्यांचे ब्लॉक चुकवित जोरदार स्मॅशींग केली. या लातूरकर खेळाडूंच्या खेळीने औरंगाबाद विद्यापीठास २०१४ नंतर पुन्हा सुवर्णपदक मिळवून दिले. लिग व नॉकआऊट सामन्यात या तिघांची खेळी तुफानी होती. संघातील अन्य खेळाडूंसाेबत उत्कृष्ट ताळमेळ राखत लातूरकर खेळाडूंनी आठ वर्षांनंतर पुन्हा सुवर्ण किमया साधली.

यापूर्वीही गाजविले होते मैदान...विद्यापीठ स्पर्धेसह या तिघांनी अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत व्हॉलीबॉल क्षेत्रात मैदान गाजवित लातूरचे नाव उज्वल केले होते. खुल्या स्पर्धेतही हे तिघे एकत्र येऊन अनेकवेळा बक्षीसे जिंकली आहेत. शालेय स्पर्धेपासूनच या खेळाडूंचा दबदबा राहीला आहे. नांदेड येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतही चांगली कामगिरी करुन असा विश्वास या तिघांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :laturलातूरDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड