शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांपूर्वी पळविण्यात आलेली राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पुन्हा लातूर जिल्ह्यात होणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 09:47 IST

छत्रपती शिवाजी महाराज चषक : व्हॉलीबॉल क्षेत्रातून आनंद

- महेश पाळणेलोकमत न्यूज नेटवर्कलातूर : २०१३ साली घोषित झालेली छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धा डॉज देत ऐनवेळी मुंबईत हलविण्यात आली होती. याची खंत अनेक दिवस लातूरच्या व्हॉलीबॉलप्रेमीत होती. मात्र, आता ९ वर्षांनंतर पुन्हा या स्पर्धा लातूरला घेण्याचे राज्याच्या क्रीडा विभागाने घोषित केले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात ही स्पर्धा लातूरच्या मैदानावर होणार हे मात्र, नक्की झाले आहे. परिणामी, व्हॉलीबॉल क्षेत्रातून आनंद व्यक्त होत आहे.

क्रीडा मंत्रालयाने १९ नोव्हेंबर २००९ रोजी कुस्ती, कबड्डी, खो-खो प्रमाणे व्हॉलीबॉलसाठी शासनस्तरावर स्वतंत्र राज्यस्तर स्पर्धा घेण्याचे ठरविले होते. पहिली स्पर्धा १५ ते २१ मे २०११ दरम्यान पुण्यातील बालेवाडी येथे पार पडली. यावेळी १९ लाखांचे या स्पर्धेला अनुदान होते. आता यात वाढ करून ५० लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. यंदाची स्पर्धा लातुरात होणार असल्याने लातूरच्या व्हॉलीबॉलला बळ मिळणार आहे.

चार खेळांच्या स्पर्धा....■ राज्याच्या क्रीडा आयुक्तांनी शासनस्तरावरील २०२२-२३ या स्पर्धाचे ठिकाण निश्चित केले असून, छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉल स्पर्धा लातुरात, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर कबड्डी स्पर्धा जळगाव, खाशाबा जाधव चषक राज्यस्तर कुस्ती स्पर्धा धुळे व भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा नागपूर येथे होणार आहे.

निधी येऊन गेला परत.....२०१३ मध्ये लातूरला स्पर्धा जाहीर झाली होती. यासाठी निधीही आला होता. मात्र, ऐनवेळी ही स्पर्धा मुंबईला हलविली. त्यामुळे आलेला निधी परत गेला होता. आता या स्पर्धेसाठी ५० लाखांचा निधी असून, विजेत्या संघास १.२५ लाख व उपविजेत्या संघास ७५ हजार रोख बक्षिसासह चषक देण्यात येणार आहे. ९ वर्षांनंतर पुन्हा लातूरमध्ये स्पर्धा होत आहेत.

दोन वयोगटांत स्पर्धा...■ व्हॉलीबॉल संघटनेच्या ज्युनिअर (१८ वर्षांखालील), युथ (२१ वर्षांखालील) अशा दोन गटांत स्पर्धा होणार असून, राज्यातील ८ विभागातील ३२ संघांचा यात समावेश राहणार असून, ३८४ खेळाडूंसह प्रशिक्षक, पंच, व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.क्रीडा विभागाकडून तयारी.....■ लातूरच्या क्रीडा उपसंचालक व जिल्हा क्रीडा कार्यालयाने या स्पर्धेसाठी कंबर कसली असून, जिल्ह्यातील आजी-माजी खेळाडूंसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सुरुवातीला याबाबत बैठक होणार आहे. पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम नियोजनासाठी बैठक पार पडेल.