शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

लातूर-कळंब मार्गावर बसेसचे नियोजन कोलमडले ! नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय

By संदीप शिंदे | Updated: August 28, 2023 15:48 IST

लातूर-कळंब या मार्गावर लातूर आगाराच्या पाच बसेस असून, कळंब आगाराच्या चार बसेस आहेत. त्यात काही बसेस नादुरुस्त होतात.

तांदुळजा : लातूर-कळंब मार्गावर एसटी महामंडळाच्या बसेसचे नियोजन नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कधी एकाच वेळी दोन बसेस येतात तर कधी दोन तास एकही बस येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. त्यातच नादुरुस्त बसेस या मार्गावर पाठविल्या जात असल्याने प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. याकडे महामंडळाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मे ते जुलै या महिन्यात बससेवा तोट्यातून फायद्यात आणण्यात लातूर आगार यशस्वी ठरले. या तीन महिन्यांत १५ कोटी ७२ लाख ७ हजार ३३६ रुपयांचा लातूर आगाराचा व्यवसाय झाला आहे. तर तीन कोटी १ लाख २६ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. यावरून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून येते. दरम्यान, लातूर-कळंब या मार्गावर लातूर आगाराच्या पाच बसेस असून, कळंब आगाराच्या चार बसेस आहेत. त्यात काही बसेस नादुरुस्त होतात. तर काही बसेस नादुरुस्त असतात. त्यातच रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावर बसेसच्या खिडक्या तुटून पडणे, बसमध्ये अचानक बिघाड होणे अशा समस्या निर्माण होत आहेत.

२६ ऑगस्ट राेजी सकाळी कळंब आगाराची बस अचानक नादुरुस्त झाली. त्यामुळे दोन तास प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. कधी-कधी एकाच वेळी दोन ते तीन बसेस येतात. यातील दोन बस तर रिकाम्याच असतात. तर कधी बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी लातूर आणि कळंब आगाराने चांगल्या बसेस या मार्गावर द्याव्यात, बसेसचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी लातूर-कळंब मार्गावरील प्रवाशांमधून होत आहे.

विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय दूर करणार...लातूर-तांदुळजामार्गे कळंब या मार्गावर लातूर आगाराच्या पाच बसेस धावतत. वेळेचे नियोजन आणि वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे लातूर बसस्थानकप्रमुख हनुमंत चपटे यांनी सांगितले. तर कळंबचे आगारप्रमुख प्रशांत करवंदे म्हणाले, कळंब, शिराढोण, तांदुळजामार्गे लातूर या मार्गावर चार बस सेवा देतात. उत्कृष्ट सेवा देण्यासाठी वेळेचे नियोजन करून वेळापत्रक तयार करू.

महामंडळ प्रशासनाने लक्ष द्यावे...लातूर-तांदुळजामार्गे कळंब या मार्गावर लातूर आगाराच्या पाच बसेस व कळंब आगाराच्या चार बसेस चालतात. या मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असल्याने महामंडळासही चांगले उत्पन्न मिळते. मात्र, या मार्गावरील सर्वच बसेसची दुरवस्था झाली आहे. काही बसेस रस्त्याचे काम सुरू असल्याने अचानक बंद पडतात. त्यामुळे लातूर आणि कळंब आगाराने याकडे लक्ष देण्याची आवश्यक असल्याचे ॲड. अनंतराव बावणे म्हणाले.

टॅग्स :state transportएसटीlaturलातूर