शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शेताच्या वाटणीवरून नातवाने ९५ वर्षीय आजोबाचा डोक्यात लाकूड, वीट घालून केला खून

By संदीप शिंदे | Updated: February 5, 2024 15:16 IST

उदगीर तालुक्यातील सुमठाणा येथील घटना

उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील सुमठाणा येथील एका ९५ वर्षीय वृद्ध इसमाचा त्याच्याच नातवाने शेती वाटणीच्या कारणावरून लाकूड डोक्यात मारून व विटाने छातीत मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. घटना घडल्यानंतर आरोपी पळून जात असताना वाढवणा पोलिसांनी अहमदपूर पोलिसांच्या मदतीने काही तासातच आरोपीस अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, सुमठाणा येथील दशरथ तुकाराम (वय ९५) यांच्या मुलाचे सुमठाणा ते चोंडी कोदळी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला शेतात घर आहे. घरामधील व्हरांडयात रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बुद्धानंद राजेंद्र किवंडे याने वडिलांच्या नावावर असलेले घर व शेतीच्या वाटणीवरून आजोबा सोबत भांडण केले. भांडणादरम्यान आरोपीने आजोबाच्या डोक्यात लाकडाने मारून डोके फोडले आणि विटाने छाती व डोक्यात मारून गंभीर जखमी करून खून केला. घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाला. 

खुनाची माहिती वाढवणा पोलीसांना मिळताच त्यांनी तपासाची चक्रे गतिमान करुन आरोपी उदगीरहून बसने अहमदपूरकडे जात असल्याची माहिती मिळविली. त्यानुसार अहमदपूर पोलिसांशी संपर्क साधून आरोपी अहमदपूर येथे बसमधून आल्यावर त्यास ताब्यात घेत वाढवणा पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीचे वडील राजेंद्र दशरथ किवंडे (वय ६५ रा. सुमठाणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर