शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात बुडालेल्या नातवाचा २४ तासानंतर सापडला मृतदेह, आजोबांनी फोडला हंबरडा

By हरी मोकाशे | Updated: August 21, 2023 19:14 IST

औराद शहाजानीची घटना, पोहोण्याच्या प्रयत्नात बुडाला पाण्यात

औराद शहाजानी (जि. लातूर) : तेरणा नदीपात्रात पोहोण्याचा प्रयत्न करताना बुडालेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर २४ तासानंतर सोमवारी दुपारी १ वाजता आपत्ती व्यवस्थापनच्या पथकास सापडला. नातवाचा मृतदेह पाहून आजोबांनी हंबरडाच फोडला.शाम व्यंकटराव जाधव (१८, रा. तळभाेग, ता. बसवकल्याण, हमु. गुंजरगा, ता. निलंगा) असे मयत युवकाचे नाव आहे.

शाम जाधव हा मुळचा रहिवासी कर्नाटकातील तळभोग येथील आहे. त्याचे आई- वडिल पुण्यात नोकरी करतात. त्यामुळे तो मामाकडे शिकण्यासाठी राहत होता. सध्या तो निलंग्यातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. रविवारी दुपारी तो गुजंरगा येथील मामाच्या शेतात आजाेबा आणि मामाच्या मुलगासाेबत गेला हाेता. आजाेबांनी तेरणा नदी पाञात म्हैस धुतली आणि ते म्हैस चारत पुढे गेले. तेव्हा मामाचा मुलगा गणेश लिंबाजी शिंदे हा नदीपाञातील लाेखंडी कलईत बसून गावाकडे गेला. दरम्यान, शाम जाधव हा नदीच्या किनाऱ्यालगत पोहत होता. तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

या घटनेची माहिती मिळताच औराद शहाजानी पाेलिस ठाण्याचे पोहेकॉ. विष्णू गित्ते, पाेकॉ. अलि शेख, पाेलिस पाटील माेहन पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनाजी मुळे आदींनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो सापडला नाही. सोमवारी आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने शाेध माेहीम राबविली. तेव्हा दुपारी १ वाजता त्याचा मृतदेह सापडला. मृतदेह पाहून नातेवाईक आक्रोश करीत होते.

टॅग्स :laturलातूरDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे