शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुरात वाहून गेलेल्या हाडोळतीच्या चालकाचा ४० तासनंतर सापडला मृतदेह!

By राजकुमार जोंधळे | Updated: September 21, 2022 16:54 IST

लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील पाच तरुण बाऱ्हाळी (ता. मुखेड) येथे वलीमा कार्यक्रमासाठी सोमवारी गेले होते.

लातूर : जिल्ह्यातील हाडोळती (ता.अहमदपूर) येथील पाच तरुण नदीवरील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सोमवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास दपका राजा (ता.मुखेड) परिसरात घडली होती. दरम्यान, यातील चार जणांनी प्रयत्न करुन स्वतःचा जीव वाचविला. तर करचालक मात्र बेपत्ता झाला होता.  अखेर ४० तासाच्या शोधानंतर बुधवार दुपारी 'त्या' कारचलकाचा मृतदेह सापडला.

पोलिसांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील पाच तरुण बाऱ्हाळी (ता. मुखेड) येथे वलीमा कार्यक्रमासाठी सोमवारी गेले होते. दरम्यान, कार्यक्रम आटोपल्यावर सोमवारी रात्री ते कारमधून (एम.एच. १४ बी.आर. ३०२१) हडोळतीकडे निघाले होते.ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसाने दापका राजा नदीला पूर आला. पूल पाण्याखाली गेला. कार चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याने ती कार न थांबवता तशीच पुढे नेली. कार पुलावर आली आणि पुराच्या पाण्यात वाहून गेली. कारमधील चार तरूणांनी प्रसंगावधन राखून कारच्या काचा फोडून स्वतःला वाचविले. तर कारचालक अझहर सत्तार शेख (वय २०) हा बेपत्ता झाला होता. त्याच्या शोधासाठी मंगळवारी दिवसभर मोहीम राबविण्यात आली. पुन्हा बुधवारी सकाळपासून शोध मोहीम सुरु केली. दुपारच्या सुमारास कार चालकाचा मृतदेह सापडला.

तलावाच्या पाण्यात सापडली कार...नदीच्या समोरील भागात तलाव आहे. पुराच्या पाण्याने तलाव तुडूंब आहे. याच तलावाच्या पाण्यावर ऑइल तरंगताना दिसून आले आणि तेथे शोध घेतला असता कार हाती लागली.

काचा फोडून ते चौघे बाहेर पडले...पुराच्या पाण्यात कर वाहून जाताना कारमधील शेख निहाल शौकत, मनियार जावेद मोतीन, सय्यद सलमान, गौस बबलू ( सर्व रा. हाडोळती ता. अहमदपूर) हे काचा फोडून बाहेर पडले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

उदगीर पालिकेच्या पथकाचेही प्रयत्न...सोमवारी रात्री पुराच्या पाण्यात कारसह चालक वाहून गेला. यातील कारचा शोध मंगळवारी लागला. तर कारचलकाचा शोधासाठी उदगीर नगर पालिकेच्या एनडीआरएफ पथकानेही शोध मोहीम राबविली. अखेर मच्छिमारांच्या प्रयत्नाला बुधवारी दुपारी यश आले.

टॅग्स :laturलातूर