विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत मंगळवारी ३९३ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर १३४३ व्यक्तींची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात १५ पॉझिटिव्ह आढळले, दोन्ही चाचण्या मिळून १८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, प्रकृती ठणठणीत झाल्याने २० जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. प्रयोगशाळेतील चाचणीचा पॉझिटिव्हिटी रेट ०.८ टक्के तर रॅपिड अँटिजन टेस्टचा पॉझिटिव्हिटी रेट १.१ टक्का आहे. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या १२१ रुग्णांपैकी ३१ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. दहा रुग्ण बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर असून, ३८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, तर ३२ रुग्ण मध्यम लक्षणाची; परंतु विनाऑक्सिजनवर आहेत. ४१ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली. रुग्ण दुपटीचा कालावधी ३७१५ दिवसांवर गेला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२३ टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण गेल्या अनेक महिन्यांपासून २.६ टक्के आहे.
१७३६ व्यक्तींच्या चाचण्यांत आढळले १८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST