श्री माध्यमिक विद्यालयात कार्यशाळा
लातूर : महिला विविध क्षेत्रांत पुढे येत आहेत. स्वतःच्या हिमतीवर जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना आत्मविश्वासाची जोड मिळाल्यास कोणतेही कार्य करणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन सुनीता बजाज यांनी केले. वैभवनगर येथील श्री माध्यमिक विद्यालयात महिलांसाठी एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापिका मनीषा शिंदे, सोनाली पाटील, प्रणिता पाचेगावकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक मुख्याध्यापिका मनीषा शिंदे यांनी केले, तर कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव प्रा. दिलीप गुंजरगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिलांची उपस्थिती होती.
खेळाडू, संघटनांच्या वतीने आदरांजली
लातूर : महाराष्ट्र क्लब लातूर, फ्रेण्ड्स क्लब लातूर, लातूर जिल्हा क्रीडा प्राध्यापक संघटना व खेळाडूंच्या वतीने माजी राष्ट्रीय व्हॉलिबॉलपटू पंचप्पा दलगडे यांना शुक्रवारी सकाळी क्रीडासंकुलात आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या जीवनकार्यावर क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी प्रकाश टाकला. याप्रसंगी स्वारातीम विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. पी.एन. देशमुख, ज्येष्ठ खेळाडू लायकअली पठाण, राजेश खानापुरे, लिंबराज बिडवे, प्रा.डॉ. महेश बेंबडे, प्रा. अनिल इंगोले, प्रा.डॉ. नितेश स्वामी, प्रा.डॉ. अशोक वाघमारे, प्रा. अनिरुद्ध बिराजदार, प्रा. भास्कर रेड्डी, पवन पाळणे, विजय सोनवणे, महेश पाळणे, विजय सोनवणे, व्यंकुराम गायकवाड, दिनेश खानापुरे, माधव रासुरे, गणेश हाके, नानासाहेब देशमुख, रितेश अवस्थी, महेश शिंदे आदींसह व्हॉलिबॉल खेळाडूंंची उपस्थिती होती.
वाहतूककोंडीने वाहनधारक त्रस्त
लातूर : शहरातील रेणापूरनाका परिसरात सायंकाळच्या वेळी वाहतुकीची काेंडी होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शहरात रात्री ८ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी असल्याने अनेक जण पाच ते सहा या वेळेत खरेदीसाठी बाहेर पडत आहे. त्यामुळे रेणापूरनाका परिसरात वाहतुकीची कोंडी होते. त्यातच सिग्नल बंद असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शहरात कूलरची दुकाने थाटली
लातूर : उन्हाचा पारा वाढत असताना शहरात कूलरची दुकाने थाटली आहेत. गंजगोलाई, दयानंद गेट परिसर, गांधी चौक, औसा रोडवरील दुकानात नवीन कूलर दाखल झाले आहेत. त्यासोबतच जुने कूलरही दुरुस्तीसाठी दुकानात आणले जात असल्याचे चित्र आहे. उन्हाचा पारा वाढेल, तशी कूलरला मागणी वाढेल, असे विक्रेत्यांनी सांगितले.