शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचे खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या निषेधार्थ शिक्षकांचा आक्रोश माेर्चा

By हरी मोकाशे | Updated: October 2, 2023 19:03 IST

शासन धोरणाविरोधात घोषणा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

लातूर : शाळांचे खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या विरोधात आणि राज्य शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्य शासनाच्या निर्णयाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी चौकातून आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. त्यात राज्य उपाध्यक्ष डी.बी. गुंडुरे, विजयकुमार गुत्ते, नरसिंग घोडके, नरेश थोरमोटे, एम.एम. जाधव, डी.एस. धुमाळ, राजेसाहेब थळकर, रमेश गोमारे, पांडुरंग पवार, राहुल देशमुख, शिवदास शिंदे, राजेश्वर शिंदे, मधुकर माने, व्यंकट काकडे, बी.एस. साेनटक्के, बालाजी पाटील, भरत बिरादार, बालाजी भांगे, वीरभद्र देशमुख, महादेव होनराव, बालाजी बेरकिळे, कालिदास माने, शिवाजी साखरे, यु.डी. गायकवाड, उजनकर, विश्वंभर भोसले, चंद्रकांत भोजने, नरिसंगे आदी सहभागी झाले होते.

खाजगीकरण थांबवा - जि.प. शाळा वाचवा...मोर्चा दरम्यान खाजगीकरण थांबवा- जि.प. शाळा वाचवा, कंत्राटीकरण थांबवा- सरकारी नोकऱ्या वाचवा, विकू नका शाळा - घोटू नका गरीबांचा गळा अशा घोषणा देण्यात आल्या. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत. सरकारी व अनुदानित शाळा खाजगी कंपन्यांना देऊ नये. शिक्षक कर्मचारी भरतीचे अधिकार खाजगी कंत्रांटदारांना देऊ नये. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सर्व शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा ३७ मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :laturलातूरTeacherशिक्षक