शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक गैरहजर असल्याने ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:39 IST

शाळा भरण्याची वेळ झाली असतानाही शिक्षक उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उदगीर तालुक्यातील नांदेड- बिदर रस्त्यावरील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस टाळे ठोकल्याची घटना आज सकाळी घडली.

उदगीर (लातूर ) : शाळा भरण्याची वेळ झाली असतानाही शिक्षक उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उदगीर तालुक्यातील नांदेड- बिदर रस्त्यावरील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस टाळे ठोकल्याची घटना आज सकाळी घडली. दरम्यान, शाळेस दोन्ही शिक्षकांची कायमस्वरुपी नियुक्ती होणार नाही, तोपर्यंत कुलूप काढणार नाही, असा पावित्रा घेतला़

उदगीर तालुक्यातील वंजारवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. शाळेत २६ विद्यार्थी असून पूर्वी येथे दोन शिक्षक होते़ शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत येथे एकच शिक्षक रुजू झाला़ त्यानंतर शाळा नियमितपणे शाळा सुरू झाली. दरम्यान, रुजू झालेले शिक्षक संजीव केंद्रे यांचा अपघात झाल्याने ते दीर्घ रजेवर आहेत़ त्यामुळे केंद्रप्रमुखांनी कर्लेवाडी येथील शिक्षक आर.के. वंगरवाड यांची तिथे नियुक्ती केली. आज सकाळी शाळा भरण्याची वेळही होऊन गेली  परंतु, संबंधित शिक्षक गैरहजर राहिल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन कायमस्वरूपी दोन शिक्षकांची नियुक्ती करणार नाहीत, तोपर्यंत कुलूप काढणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला़

११.४५ वा़ शाळेवर हजऱ़़वंजारवाडीच्या शाळेवर शिक्षक गैरहजर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली़ त्यामुळे मी तात्काळ संबंधित शिक्षकाला बोलून शाळेवर हजर राहण्यास सांगितले. मीसुध्दा ११.४५ वा़ शाळेवर हजर झालो. ग्रामस्थांनी कुलूप काढले नसल्याने दिवसभर त्याठिकाणीच आम्ही थांबलो. यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती दिली असल्याचे केंद्रप्रमुख एन.व्ही. रोकडे यांनी सांगितले़

२.३० वा़ शिक्षक, केंद्रप्रमुख हजऱ़़सकाळी शिक्षक गैरहजर असल्याचे समजताच गावातील नागरिक शाळेकडे गेले़ संतप्त नागरिकांनी घरचे कुलूप आणून शाळेच्या मुख्य द्वारास व वर्गखोल्यांना ठोकले़ त्यानंतर शाळेसमोर ठिय्या मांडला. दरम्यान, २़३० वा़ केंद्रप्रमुख व शिक्षक शाळेवर आले. या प्रकरणाची वरिष्ठ जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत शाळा उघडणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याचे पालक मनोहर यमणर, अभिमान कांबळे यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती ग्रामस्थांनी दिल्याने जि.प. सदस्या विजयाताई बिरादार, सरपंच शैलजाताई पटवारी यांनी भेट देऊन वरिष्ठांकडे दाद मागू, असे सांगितले. यावेळी राजपाल सुरनर, बालाजी पाटील, देविदास मुंडे, बाजीराव सुरनर, राम सुरनर, नागनाथ सुरनर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाLatur z pलातूर जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र