शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर शहरात कचरा स्पॉटवर स्वच्छता ताईंची नजर; दंडात्मक कारवाईची मोहीम तीव्र

By हणमंत गायकवाड | Updated: August 8, 2023 14:49 IST

शहरात २० जणांवर दंडात्मक कारवाई, तर सहाजणांवर पोलिसांकडून नोटीस

लातूर : कचरा उचलल्यानंतरही वारंवार कचरा पडणाऱ्या ठिकाणी आता स्वच्छता ताईंची नजर राहणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून स्वच्छता ताई कचरा पडणाऱ्या ठिकाणी थांबून कचरा टाकणाऱ्यांना प्रारंभी समजून सांगत आहेत. त्यानंतरही न ऐकल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत २० जणांवर दंडात्मक, तर सहा जणांवर पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

लातूर शहरामध्ये ६० ते ७० कचरा स्पॉट आहेत. तिथे झालेल्या कचरा साफ केल्यानंतर दोन दिवसांतच कचऱ्याचा ढीग पडत आहे. प्रत्येक नगरात नियमित घंटागाडी येत असताना नागरिक त्या ठिकाणी कचरा फेकून टाकतात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. राजीव गांधी चौक ते बसवेश्वर चौक रिंग रोड परिसर, तसेच शहरातील प्रकाशनगर, छत्रपती चौक, सिद्धेश्वर समशानभूमी ६० फुटी रोड, बार्शी रोडचा समांतर रस्ता, खाडगाव रोड, अंबाजोगाई रोड आदी ठिकाणी कचरा टाकण्याचे स्पॉट झाले आहेत. या ठिकाणी कचरा उचलल्यानंतर दोन दिवसांत पुन्हा कचरा पडतो. त्यामुळे अशा ठिकाणी आता स्वच्छता ताईंची नजर राहणार आहे. कचरा टाकल्यानंतर पोलिसांमार्फत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये अंबाजोगाई रोड परिसरात कचरा स्पॉट साफ केल्यानंतर कचरा टाकल्याने २० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर सहाजणांना पोलिसांमार्फत नोटीस पाठविण्यात आली आहे.

अशा लोकांकडून झाले कचरा स्पॉट...शहरालगत वस्त्या असलेल्या नागरिकांकडून कामावर जाताना फेकला जातो कचरा. शहरातच राहणारे; परंतु दोघेही नोकरीवर असलेल्या नागरिकांकडून रस्त्यावरच टाकला जातो कचरा. परिसरातील दुकानदार सायंकाळच्या वेळी दुकान बंद करताना साफसफाई करून रस्त्यावर कचरा टाकतात.

दररोज दीडशे टन कचरा संकलन होऊनही कचरा स्पॉट...लातूर शहरात दररोज घंटागाडीमार्फत दीडशे टन कचऱ्याचे संकलन केले जाते. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. स्वच्छतेचे गाणे ऐकवीत घंटागाडी घरोघरी जाते. तरीही कचऱ्याचे स्पॉट मनपाची डोकेदुखी बनत आहे.

दंडात्मक कारवाई करण्यासाठी मोहीम तीव्र होणारघंटागाडी येत नसेल तर ठीक आहे; पण प्रत्येक नगरात, वॉर्डात दररोज घंटागाडी कचरा संकलनासाठी जाते. तरीही बाहेर रस्त्यावर कचरा फेकला जातोय. यावर आता दंडात्मक आणि पोलिस कारवाई तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी कचरा स्पॉटवर आता स्वच्छता ताईंची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न