शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सुशीलाताई पाटील निलंगेकर यांचे निधन; रुग्णालयात उपचार सुरू होते

By राजकुमार जोंधळे | Updated: February 17, 2025 04:56 IST

मृत्यूसमयी त्या ८७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर साेमवार, १७ फेब्रुवारीराेजी सिंदखेड येथील शेतात दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

निलंगा (जि. लातूर) : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशीलाताई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने रविवारी रात्री ८.३० वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर साेमवार, १७ फेब्रुवारीराेजी सिंदखेड येथील शेतात दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. शरद पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्या त्या माताेश्री हाेत. तर माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या सासू आणि माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे, जावई असा माेठा परिवार आहे.निलंगा तालुक्यातील बामणी धानाेरा शेतकरी अप्पाराव धानुरे यांची कन्या सुशिलाताई यांचा विवाह १९५१ मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाेबत झाला. त्यांनी चार मुले, एक मुलगी असा परिवार सांभाळत डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना आयुष्यभर खंबीर साथ दिली. त्या अंत्यत प्रेमळ, कुटुंब वत्सल्य, सुसंस्कारित, आदरातिथ्यशील गृहिणी हाेत्या. डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रगतीशील जिवनात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

शेती व घरकामाच्या जबाबदाऱ्या त्यांनी प्रभावीपणे सांभाळल्या त्यामुळेच निलंगेकरांना सार्वजिनक व राजकीय जिवनात यशस्वीरित्या काम करता आले. अलिकडे त्या काही दिवसांपासून आजारी हाेत्या. उपचारासाठी त्यांना लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. दरम्यान, उपचार सुरु असताना रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या सर्वांसाठी आईसाहेब म्हणून परिचित हाेत्या.