उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगर पालिकेच्या मालकीच्या बनशेळकी, देवर्जन, भोपणी तलावात गेल्या वर्षभरापासून मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी परतीच्या पावसात झालेल्या अतिवृष्टीत बनशेळकी तलाव, देवर्जन तलाव, भोपणी तलाव ओव्हर फ्लो होऊन ओसंडून वाहत आहेत. शहरातील नागरिकांना पाण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. गेल्या वर्षभरात पाणीसाठा मुबलक असूनही महिन्यातून दोन किंवा तीन वेळा नगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जात आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असल्याने गेल्या दोन वर्षाची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी, तसेच स्ट्रीट लाईट तत्काळ सुरू करावी. अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष समीर शेख, शफी हाश्मी, तालुकाध्यक्ष अजहर मोमीन, शहराध्यक्ष फेरोज पठाण, खाजा शेख, राजकुमार गंडारे, प्रदीप जोंधळे, प्रेम तोगरे, दुर्गाप्रसाद कुलकर्णी, बापू साळुंके, अभिजित गायकवाड, समाधान सूर्यवंशी, नरसिंग कदम, खाजा पटेल, अब्दुल हकीम बागवान, बालाजी साळुंके, राज ढोबळे, अजय जाधव, अभिषेक उमरगे, मुसा पठाण, यशोदीप जाधव, सलीम शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उदगीर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST