लातूर : घरप्रपंचात लागणाऱ्या किराणा मालाचे दर एकीकडे वधारले आहेत, तर दुसरीकडे भाजीपाला कवडीमोल झाला आहे. गेल्या महिन्यात कांदा ६० ते ७० रुपयांच्या घरात गेला होता. तो आता ३० रुपयांवर आला आहे. टोमॅटो प्रति किलो ५ रुपयांवर घसरला आहे. खाद्य तेलाचे भाव सध्या जैसे थे आहेत. प्रति किलो १२० ते १३० रुपये दराने खाद्य तेल विकले जात आहे.
लातूर शहरातील भाजी मंडई, रयतु बाजार आणि जिल्ह्यातील आठवडी बाजारात भाजीपाल्यांची आवक होत आहे. दरम्यान, भाव मात्र गडगडले आहेत. यातून सामान्यांना दिलासा मिळाला आहे. कांदा, बटाट्याचे भाव आवाक्यात आहेत. कांदा ३० रुपये किलो, बटाटे २० रुपये किलो, हिरवी मिरची २० रुपये, टोमॅटो ५ ते ७, पालक १०, मेथी ८, शेपू ५, कांदा पेंढी ८, चुका ४० रुपये, काकडी ५ रुपये, भेंडी २० रुपये, चवळी ४० रुपये, भोपळा १० रुपये, मुळा ३० रुपये गड्डी, वांगे २० रुपये, दोडका ४०, शेवगा ६०, शिमला मिरची ६०, कोथिंबीर २०, गवार ४०, लसूण ६०, अद्रक ३० रुपयाने मिळत आहे. शेवगा १५० रुपयांवरून ६० रुपयांवर आला आहे.
किराणा मालामध्ये खाद्यतेल १५० रुपयांवरून आता १२० रुपयांवर उतरले आहे. डाळींचे भाव १० रुपयांनी घसरले आहेत. तूरडाळ ११०, मूगडाळ ११०, उडीद डाळ ११०, चनाडाळ ७०, मसूर डाळ ७०, शाबू ७०, भगर ८०, शेंगदाणे ८० ते ९०, गूळ ५० रुपये किलो दराने विकला जात आहे.
दिवाळीनंतरही साखरेची गोडी कायम आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे दर स्थिर आहेत. होलसेलमध्ये प्रति क्विंटल ३,३०० तर किरकोळमध्ये ३,५०० आहे.