पुण्यातील कात्रज येथे मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात शनिवारी निवड चाचणी घेण्यात आली. यात ९७ किलो वजनीगटात औसा तालुक्यातील टाका गावचा मल्ल शैलेश शेळके याची वरिष्ठ राष्ट्रीय ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यास अर्जुन पुरस्कारविजेते काका पवार, गोविंद पवार यांचे मार्गदर्शन लाभले. निवडीबद्दल जिल्हा संघटनेचे रावसाहेब मुळे, डिव्हिजन देशमुख, प्रा. आशिष क्षीरसागर यांनी स्वागत केले.
चमकदार कामगिरी...
गत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेते पद पटकावून शैलेश शेळके चर्चेत आला. यापूर्वी झोकोस्लाेव्हिया येथे झालेल्या कॅडेट कुस्ती स्पर्धेत शैलेशने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यासह अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत त्याने अनेक पदके पटकाविली आहेत. सीनिअर राष्ट्रीय स्पर्धेत दोनवेळा त्याने प्रतिनिधित्व केले आहे.