शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत अध्यापनाचे धडे

By आशपाक पठाण | Updated: May 12, 2024 19:46 IST

रेणा साखर कारखान्याचा पुढाकार : दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्र

लातूर: शासकीय सेवेत संधी मिळावी म्हणून अनेक विद्यार्थी विविध केंद्रात शुल्क भरून तयारी करतात. लातूर शहरातही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्र रेणा साखर कारखान्याच्या पुढाकारातून लातुरातही सुरू करण्यात आले आहे.

ग्रामीण, शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सारख्या शिक्षणाची सोय आपल्या भागातच उपलब्ध व्हावी याकरिता माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून रेणापुर तालुक्यातील निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखाना व लातूर येथील सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय परिसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय नि:शुल्क सुरू करण्यात आले आहे.

एम.पी.एस.सी.कम्बाईन व सरळसेवा ऑनलाईन परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ दिवसांचा क्रॅश कोर्स १३ मे पासून सुरू होत आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे यांनी केले आहे.

आता दुसरी शाखा लातुरात..विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव स्पर्धा परीक्षा केंद्राची दुसरी शाखा लातूर येथे श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय परिसरात सुरू करण्यात आली आहे. तसेच निवाडा येथेही कारखाना स्थळी मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. एम.पी.एस.सी. राज्यसेवा पीएसआय एसटीआय/ एएसओ बँकिंग, सरळसेवीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेस आहेत. प्रत्येक बॅचचे नियमित ऑनलाईन व ऑफलाइन लेक्चर्स, निवड झालेल्या अधिकाऱ्यांशी संवाद, डिजिटल अभ्यासिका व सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्राचे समन्वयक प्रा. विनोद नवगिरे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर