शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दुध तापविताना स्टोव्हचा भडका उडाल्याने लातुरात विद्यार्थिनी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:29 IST

घडलेल्या घटनेत काही गुन्हा असेल तर पोलीस सक्षमपणे कारवाई करतील.

ठळक मुद्देपेटवून दिल्याची माहिती चुकीची

लातूर : सायंकाळच्या वेळी दूध तापविताना स्टोव्हचा भडका उडाल्याने दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी जखमी झाली असून तिच्या चेहऱ्याला तसेच उजव्या हाताला भाजले आहे. दरम्यान, सदरील जखमी मुलगी व तिच्या आईच्या जबाबानुसार पेटवून दिल्याची पसरविलेली माहिती चुकीची असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले.

दीपज्योतीनगरमधील दहाव्या वर्गात शिकणारी मुलगी सायंकाळच्या वेळी घरात दूध तापवित होती. त्यावेळी अचानक स्टोव्हचा भडका होऊन ती भाजली. घटना घडली तेव्हा घरी कोणीही नव्हते. पहिल्यांदा लहान भावाने बहीण भाजल्याचे बघितले. आरडाओराडा करुन शेजाऱ्यांना बोलविले. त्यांनी मुलीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने म्हणाले, आईचा आणि मुलीचा जबाब डॉक्टरांसमोर घेतला आहे. त्यानुसार दूध तापविताना ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जबाब घेतलेला नव्हता. पोलीस सर्व बाजूंनी तपास करतील. परंतु, सद्यस्थितीत तरुणीला पेटविले अशी माहिती पसरविणे चुकीचे आहे. घडलेल्या घटनेत काही गुन्हा असेल तर पोलीस सक्षमपणे कारवाई करतील. परंतु, राज्यात घडत असलेल्या घटनांचा संदर्भ देऊन चुकीची माहिती कोणीही पसरवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. माने यांनी केले. दरम्यान, यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी जबाब घेतले आहेत. त्यामध्ये कोणावरही आरोप नसल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाही.

गॅस चार दिवसांपूर्वी संपला़घरातील गॅस सिलेंडर चार दिवसांपूर्वी संपल्यामुळे मुलगी स्टोव्हवर दूध तापवित होती़ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता गॅसचे रेग्यूलेटर काढून ठेवलेले होते़ यासंदर्भात पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे म्हणाले, भडका उडाल्यानंतर मुलगी तोंडावर पाणी मारत होती़ तितक्यात भाऊ आला़ दोघेही ओरडले़ शेजारी चुलती राहते़ तीही धावत आली़ त्यानंतर सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले़

टॅग्स :fireआगlaturलातूरBlastस्फोट