कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्ग बंद आहेत. काही महाविद्यालये ऑनलाइन तासिका घेतात, मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे ॲण्ड्रॉइड मोबाइलची सुविधा नाही. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे ऑनलाइन वर्ग करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जात नाही. अनेक महाविद्यालयांत प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे समाज कल्याण विभागाने शिष्यवृत्ती मंजूर केली नाही. शैक्षणिक वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाली नाही. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा विचार करून समाज कल्याण विभागाने तत्काळ शिष्यवृत्ती मंजूर करून विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी भीक मांगो आंदोलन केले. या आंदोलनात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या जिल्हाध्यक्ष प्रीतम दंडे, अजित राज गंगावणे, रोहित साबळे, करण इंगळे, अंजली गायकवाड, हर्षदा ढवळे, प्रेमराज घोभाळे, श्रद्धा ढवळे, सागर आडसुळे, करण सूर्यवंशी, अरुण सूर्यवंशी, नीलेश कांबळे, आशिष कांबळे, पवन कांबळे, रवी इंगळे, नागेश सातपुते, करण सूर्यवंशी, धनराज मोरे, सचिन खंडागळे, अभिनव वाहुळे, सुदर्शन साबळे, अभिषेक सूर्यवंशी, सिद्धार्थ गायकवाड, प्रवीण करमते आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.
समाज कल्याण विभाग आणि महाविद्यालयस्तरावर शिष्यवृत्तीचे प्रस्ताव रेंगाळले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्याशिवाय पुस्तके, वह्या घेता येत नाही अशी परिस्थिती असताना शिष्यवृत्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दंडे यांनी केला आहे.