शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांना जॅमर लावून मनमानी वसुली करणे बंद करा; लातुरात भाजपचे आंदोलन

By हणमंत गायकवाड | Updated: August 21, 2023 19:07 IST

हा वसुलीचा प्रकार असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टीने सोमवारी मनपाच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला

लातूर : शहरात रस्त्यावर थांबविलेल्या वाहनांना जॅमर लावून मनमानी पद्धतीने वसुली केली जात आहे. ही वसुली थांबविण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पार्किंगची सोय नसताना तसेच रस्त्यावर मार्किंग केली नसतानाही टोइंग वाहनद्वारे वाहनांना जॅमर लावले जात आहे. मनमानी पैसे आकारल्यानंतरच जॅमर काढले जात आहे. हा वसुलीचा प्रकार असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टीने सोमवारी मनपाच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. या आंदोलनात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांच्यासह शिरीष कुलकर्णी, ॲड. शैलेश गोजमगुंडे, प्रवीण सावंत, अजितसिंह पाटील कव्हेकर, रागिणीताई यादव, गणेश गोमचाळे, रवी सुडे, संजय गिरी, हवा पाटील, दिग्विजय काथवटे, गोटू केंद्रे, संगीत रंदाळे, देवा साळुंके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शहर स्वच्छतेकडे लक्ष द्या...डास उत्पत्ती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळत आहेत. या आजाराला रोखण्यासाठी शहरामध्ये डास उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, त्यासाठी धूर फवारणी करावी, दररोज कचरा उचलला जावा. कचरा डेपोवरील समस्या दूर कराव्यात. डेपोवर कचरा साचणार नाही, त्यासाठी डम्पिंग करणे गरजेचे आहे. त्याकडे मनपाने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांनी केली. दरम्यान, जॅमर बसविण्याचे कंत्राट ज्या संस्थेला दिले आहे, त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड नाही. वाहन चुकीच्या ठिकाणी कोण लावतेय याची वाट ते पाहत राहतात. त्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.

टॅग्स :laturलातूरtraffic policeवाहतूक पोलीसMuncipal Corporationनगर पालिका