शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या प्रकल्पाचेच काम सुरू करा; साैरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले

By राजकुमार जोंधळे | Updated: September 9, 2023 22:54 IST

महिलांनी शनिवारी महाजनकोकडून उभारण्यात येत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले.

बेलकुंड : ज्या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या होत्या, तो प्रकल्प उभा करा, अन्यथा आमच्या जमिनी आम्हाला परत करा, अशी मागणी करत शिंदाळा (लो.) येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी, महिलांनी शनिवारी महाजनकोकडून उभारण्यात येत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले.

औसा तालुक्यातील शिंदाळा (लो) शिवारातील जवळपास दहा-बारा वर्षांपूर्वी शासनाकडून १३२ शेतकऱ्यांची ४५० एकरांवर जमीन भेल आणि महाजनकोच्या १५०० मेगावॅट वायू ऊर्जा प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, जमीन अधिग्रहण करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गत दहा-बारा वर्षांमध्ये नियोजित प्रकल्पासाठी काेणतीही हालचाल झाली नाही. दरम्यानच्या काळात वायू ऊर्जा प्रकल्पाच्या जागी राज्य सरकारने येथे अवघ्या ६० मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली. शिवाय, या प्रकल्पाच्या उभारणीसाठी एका खासगी कंपनीला कंत्राटही दिले हाेते. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना दिलेले नोकरीचे आश्वासन अद्यापही हवेतच आहे. प्रकल्पग्रस्तांचा केला विश्वासात...

शिवाय, सौरऊर्जा प्रकल्पात रूपांतर करतेवेळी प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेतले नाही. याबाबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी महाजनकोच्या कार्यालयात अनेक खेटे मारूनही यश मिळाले नाही. परिणामी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, महिलांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन सुरू असलेले काम शनिवारी बंद पाडले.  

जमिनी परत करा; प्रकल्पगस्तांचा संताप...

वायू ऊर्जा वीज निर्मितीचा प्रकल्प उभा करा, अन्यथा आमच्या जमिनी परत करा, अशी मागणी संतप्त प्रकल्पग्रस्तांनी केली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही प्रकल्पग्रस्तांनी काम बंद पाडले होते. तेव्हापासून कंपनीने काम बंद ठेवले होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत कंपनीने पुन्हा कामाला सुरुवात केली हाेती. याची माहिती प्रकल्पग्रस्तांना मिळाल्यानंतर संतप्त शेतकरी, महिलांनी शनिवारी पुन्हा काम बंद पाडले.