यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, सर्व सहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगमवार यांची उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १६१ गावांचा अटल भूजल योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. लातूर, चाकूर, रेणापूर आणि निलंगा तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींमधील १३६ गावांचा समावेश असून, या सर्व गावांचे जलसुरक्षा आराखडे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शाश्वत स्वरूपात भूजलाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून ‘भूजल जागृती’ हा महत्त्वाचा विषय आहे. सतत घसरत जाणारी भूजल पातळी आणि नियमित स्वरूपाचे पर्जन्यमान आणि विविध बाबींसाठी होणारा भूजलाचा उपसा ही बाब चिंताजनक आहे. भूजल मूल्यांकन २०१७ नुसार अतिशोषित/अंशत: घोषित करण्यात आलेल्या गावांपैकी १३६ गावांमध्ये भूजल जागृती करणे, जलसुरक्षा आराखडे तयार करणे, अभिसरणअंतर्गत विविध खात्यांच्या उपाययोजनांचा समावेश करून भूजल पुनर्भरण करणे, पीकपाणी व्यवस्थापन करणे, ग्रामस्तरीय पाणलोटातील पाण्याचा ताळेबंद करणे, अशा विविध बाबींचा समावेश असणारा प्रत्येक गावांचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
भूजल जागृती चित्ररथाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST