शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: लातूर विभागातील २५६ एसटी कामगार बडतर्फ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 18:11 IST

१०० दिवसांनंतही कामगार संपावर ठाम, गत साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपाबाबत अद्यापही समाधानकारक ताेडगा निघाला नाही.

- राजकुमार जोंधळे लातूर : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी गत १०० दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर अद्यापही ताेडगा निघाला नाही. परिणामी, लातूर विभागातील पाच आगारांसमाेर सुरू असलेल्या संपात सहभागी असलेल्या एसटी कामागर, कर्मचाऱ्यांपैकी ३४३ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर, त्यातील २५६ जणांना बडतर्फ करण्यात आले आहे.

गत साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपाबाबत अद्यापही समाधानकारक ताेडगा निघाला नाही. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कामगार, कर्मचारी ठाम आहेत. संपामध्ये सहभागी असलेल्या कामगारांवर महामंडळ प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. १ जणाची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. तर, ३४३ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ९४ कामगारांची अन्य ठिकाणच्या आगारामध्ये बदली करण्यात आली आहे. लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगरातील एकूण ७०१ कामगारांवर सेवासमाप्ती, निलंबन, बदली आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. हा आकडा आता दिवसेंदिवस वाढत आहे. टप्प्या-टप्प्याने नाेटिसा बजावण्यात आलेल्या कामगारांची चाैकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

संपामध्ये १ हजार ६४८ कामगारांचा सहभाग...लातूर विभागातील पाच आगारांसमाेर गत १०० दिवसांपासून सुुरू असलेल्या संपामध्ये सध्याला १ हजार ६४८ एसटी कामगारा सहभागी आहेत. लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारात एकूण कामगार, कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ५५२ आहे. यातील ६८७ कामगार प्रत्यक्ष कामावर हजर झाले आहेत. ३५ जण गैरहजर आहेत. तर साप्ताहिक आणि रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १८२ आहे.

जिल्ह्यात शनिवारी विविध मार्गावर ८० बसेस धावल्या...लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातून शनिवारी विविध मार्गावर ८० बसेस धावल्या. यासाठी १४२ चालक, वाहक कामवर परतले आहेत. शिवाय, १५ वाहतूक नियंत्रकही वाहक म्हणून सेवा बजावत आहेत. आता टप्प्या-टप्प्याने महामंडळाची प्रवासी वाहतूक पूर्वपदावर येत आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपlaturलातूर