निवेदनात म्हटले आहे, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, महसूल कर्मचारी यांना लस देण्यात आली. मात्र एसटी कर्मचारी सतत प्रवाशांच्या संपर्कात राहतात त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. लातूर विभागातील ११७ कर्मचारी मुंबई येथील प्रवाशांच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमात जोखीम पत्करून सेवा करीत आहेत. दर १३ दिवसाला कर्मचाऱ्यांना मुंबईला येणे-जाणे करावे लागते. त्यातच आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या बाबींचा विचार करून एसटी चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, इतर अधिकारी यांना लस देण्यात यावी, अशी मागणी विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली असल्याचे एसटी कामगार सेनेच्या सांगण्यात आले.
निवेदनावर विभागीय अध्यक्ष विवेकानंद शेटे, कार्याध्यक्ष सतीश पवार, विभागीय सचिव व्यंकटराव बिरादार यांची नावे आहेत.