शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result: राज्यात लातूर बोर्ड तिसऱ्या स्थानी; ७० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 14:56 IST

लातूर विभागीय मंडळाचा ९७.२७ टक्के निकाल : याही परीक्षेत मुलींचीच सरशी

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला असून, लातूर विभागाचा ९७.२७ टक्के निकाल लागला आहे. १०० पैकी १०० गुण मिळविणाऱ्या राज्यातील १२२ विद्यार्थ्यांमध्ये लातूर विभागातील ७० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर लातूर बोर्ड राज्यात तिसऱ्या स्थानावर आहे.

एकंदर, दहावीच्या निकालात लातूरचा दबदबा कायम आहे. दहावीच्या परीक्षेसाठी लातूर मंडळातून एकूण १ लाख ७ हजार ९५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५ हजार ८९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, यातील १ लाख ३ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे. लातूर विभागात नांदेड जिल्ह्याचा ९६.६८, उस्मानाबाद जिल्ह्याचा ९७.८४ आणि लातूर जिल्ह्याचा ९७.६३ टक्के निकाल लागला आहे. तर विभागाचा ९७.२७ टक्के निकाल लागला आहे.

५६ हजार १२२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात...लातूर विभागातील एकूण परीक्षार्थ्यांपैकी ५६ हजार १२२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व परीक्षार्थ्यांना ७५ टक्क्यांच्यावर गुण मिळाले आहेत. ३२ हजार २८९ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांच्या वर गुण घेतले आहेत. १२ हजार ६४२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, १९५० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत. एकूण १ लाख ३ हजार ३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत यशस्वी झाले असल्याचे लातूर बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष तथा सचिव सुधाकर तेलंग यांनी सांगितले.

लातूर बोर्डात मुलींचीच बाजी...लातूर विभागात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण ४८ हजार ४६७ मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. त्यापैकी ४८ हजार ५९६ मुली या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. ९८.२० टक्के मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. तर ५७ हजार ४२३ मुले दहावीच्या परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी ५५ हजार ४०७ मुले पास झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.४८ टक्के आहे. १.७२ टक्के मुली मुलांपेक्षा पुढे आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालlaturलातूर