लातुरातील औसा राेडवरील डाॅ. कल्याण बरमदे हाॅस्पिटलमध्ये आयाेजित शिबिराचे उद्घाटन डाॅ. कल्याण बरमदे, डाॅ. मनीषा बरमदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डाॅ. बी. आर. पाटील, ग्रीन लातूर वृक्षचे डाॅ. पवन लड्डा, डाॅ. जितेन जयस्वाल, प्रा.डाॅ. उमाकांत जाधव यांच्या हस्ते झाले. २ जुलैपासून लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध गावात, तालुक्याच्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे. या शिबिराला दिवसेंदिवस माेठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या माेहिमेत विविध सामाजिक संस्था, संघटनांनी सहभाग नाेंदविला आहे. रविवारी झालेल्या शिबिराला लातूर ग्रीन वृक्ष टीमचे इम्रान सय्यद, सुलेखा कारेपूरकर, सुरज साखरे, महेश गेल्डा, मनमाेहन डागा, आशा आयाचित, प्रमाेद निपाणीकर, अरविंद फड, पांडुरंग बाेडके, डाॅ. अमृत पत्की, माउली ब्लड बँकेचे विलास कारंजे, संगमेश्वर बरुरे, साेमनाथ बुरबुरे, कविता हुडे, साेनाली बनसाेडे, रेणुका सुतार यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ. सितम साेनवणे यांनी केले.
संकटकाळात माेहिमेचा आधार : डाॅ. कल्याण बरमदे
काेराेनाच्या संकटकाळात ‘लाेकमत’ने हाती घेतलेली रक्तदान माेहीम रुग्ण-नातेवाईकांसाठी माेठा आधार ठरली आहे. रक्तातील चार घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. एखाद्या रुग्णाला वेळेवर रक्त मिळाले तर अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी मदत हाेते. यासाठी रक्तदान चळवळ महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन डाॅ. कल्याण बरमदे यांनी येथे केले. यावेळी डाॅ. मनीषा बरमदे यांनी रक्तदान करत या माहिमेत आपला सहभाग नाेंदविला. यावेळी ३८ दात्यांनी रक्तदान केले.
लाेकमत रक्तदान माेहिमेतील आजचे रक्तदाते...
ओ पाॅझिटिव्ह रक्तगट : महेश गेल्डा,राेहन येराेळकर, डाॅ. मनीषा बरमदे, डाॅ. पवन लड्डा, सागर खराडे, दत्तात्रय बेल्लाळे, सुलेखा कारेपूरकर, दयाराम सुडे, अनुराधा कनामे, प्रणव बिडवे, इम्रान जब्बार सय्यद, विक्रांत भुमेकर, खाॅजाखाॅ पठाण.
बी पाॅझिटिव्ह रक्तगट : डाॅ. अमृत पत्की, प्रमाेद निपाणीकर, ब्रह्मानंद रेड्डी, व्यंकटेश्वर बल्लाळे, संताेष इंगळे, स्वप्निल जाधव, सुमित उपाडे, अनिल चाेले, दत्ता जाधव, पुष्कर कुलकर्णी, प्रतीक कदम, ज्याेती कदम, डाॅ. कुलकर्णी, महेश मिटकरी.
ए पाॅझिटिव्ह रक्तगट : अक्षय पाटील, ज्ञानेश्वर निलंगे, सचिन क्षीरसागर, प्रकाश बांगर, शुभम उटके, सिचन चाैगुले, महेश बारसुळे, गणेश लहाने, अम्बुलाल शेख.
एबी पाॅझिटिव्ह रक्तगट : अभिषेक हुडगे, बाबा माेमीन.