वलांडी येथील व्यंकटेश विद्यालयाच्या सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष व्यंकटराव पाटील होते. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा व शिक्षणमहर्षी रामचंद्रराव पाटील- तळेगावकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, प्रशांत पाटील-जवळगेकर, पृथ्वीराज शिवशिवे, पंचायत समिती सभापती सविता पाटील, उपसभापती शंकरराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी बिरादार, ज्येष्ठ नेते भगवानराव पाटील-तळेगावकर, चेअरमन भरत चामले, गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी बोईनवाड, बाबूराव इंगोले, माजी उपसभापती तुकाराम पाटील, उदयसिंग ठाकूर, माजी सरपंच राम भंडारे, तळेगावचे सरपंच सदाशिव पाटील, पोलीस पाटील संभाजी पाटील, शिवाजी पाटील, तानाजी पाटील, शहाजी पाटील, विश्वजित पाटील, हरिश्चंद्र पाटील, प्राचार्य गोपीनाथ सगर, डब्ल्यू. एस. कांबळे, उपप्राचार्य डी. व्ही. राजे, मुख्याध्यापक आर. के. बिरादार, अंकुश मुळे, भद्रे, सुनील क्षीरसागर, प्रा. रणजित पाटील, प्रा. चंद्रशेखर काळे, प्रा. नंदू पटवारी, धनाजी पाटील, दिलीप बच्चेवार, चंद्रकांत माने, देवणी तालुका वार्ताहर रमेश कोतवाल आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. मदन आळंदीकर यांनी केले. आभार प्रा. रणजित हुडे यांनी मानले.