उदगीर येथे रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने महिला शक्ती सन्मान कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी मंचावर रमेश अंबरखाने, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, विमलताई गर्जे, रोटरीचे अध्यक्ष विशाल तोंडचिरकर, सचिव कीर्ती कांबळे, सरस्वती चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सुप्रिया चिकमुर्गे, आदिती पाटील कौळखेडकर, डॉ. किरण गोरे-जाधव, शीलाताई जंपावाड यांचा गाैरव करण्यात आला. त्याचबराेबर विमलताई गर्जे यांच्या वतीने समाजातील ११ गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, रोटरी क्लब ऑफ सेंट्रलने समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव केल्याबद्दल कौतुक केले. महिलांचे सक्षमीकरण करणे हे शासनधोरण असल्याचे सांगितले. महिला अनेक क्षेत्रात आघाडीवर असून, महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या वतीने महिला धोरण राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक विशाल तोंडचिरकर यांनी केले तर कार्यक्रम आयाेजनाची भूमिका सरस्वती चौधरी यांनी विशद केली. सूत्रसंचालन मंगला विश्वनाथे, विशाल जैन यांनी केले. आभार सचिव कीर्ती कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉ. संग्राम पटवारी, डॉ. प्रशांत चोले, प्रवीण पुरी, प्रदीप बेद्रे, प्रा. मल्लेश झुंगा, श्रीमंत सोनाळे, महानंदा सोनटक्के, प्राचार्या डॉ. सुनीता चवळे, ज्योती चौधरी, विद्या पांढरे, प्राचार्य डॉ. दत्ता पाटील टाकळीकर, ॲड. विक्रम संकाये, प्रशांत मांगुळकर, प्राचार्य व्ही. एस. कणसे, मोतीलाल डोईजोडे, प्रमोद शेटकार, रवींद्र हसरगुंडे, संतोष फुलारी, गजानन चिद्रेवार, मंगेश साबणे, श्रीकांत पाटील, विपीन जाधव, अमोल नखाते, अनिल सुवर्णकार, प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.