पोलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील तांदूळवाडी, वाढवणा, अंबाजोगाई रोड, बार्शी रोड, बोरवटी, औसा रोड, विकासनगर, आवंतीनगर, खोरी गल्ली, केळगाव, लांबोटा, कासार जवळा, दिंडेगाव, चिंचोली बल्लाळनाथ आदी ठिकाणी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी नियुक्त केलेल्या विशेष पथकाने छापेमारी केली. दरम्यान, दारूची चोरट्या मार्गाने वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन चारचाकी आणि आठ दुचाकींची झाडाझडती घेतली. यावेळी १ लाख ४३ हजार २२० रुपयाची देशी, विदेशी दारू हाती लागली. पोलीस पथकाने एकूण १० वाहनांसह दारू असा १६ लाख ६५ हजार १७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई १३ ते १५ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे. याबाबत त्या त्या पोलीस ठाण्यात रमेश मोहनराव कोद्रे (५०, रा. तांदूळवाडी), गोविंद बालाजी डावरे (२६, रा. राजीवनगर, लातूर), शिवशंकर शेषराव चव्हाण (२८, रा. वाढवणा), विशाल संजय कामेगावकर (२५,रा. प्रकाशनगर, लातूर), संतोष पंडित लकडे (३४, रा. बोरवटी), नामदेव रावसाहेब घोडके (३१, रा. शिऊर), श्रीकांत श्रीमंत डोंबे (४०, रा. विकासनगर, लातूर), आकाश किशोर लांडगे (२५, रा. आवंतीनगर, लातूर), शुभम उत्तम कांबळे (२५, रा. नांदेड रोड), सोमनाथ हणमंत सूर्यवंशी (२५, रा. आरजखेडा, ता. रेणापूर), माधव व्यंकटराव कळसे (रा. लांबोटा, ता. निलंगा), दिगांबर गोविंद गिरी (रा. कासार जवळा), संजय उद्धव भोसले (३८, रा. दिंडेगाव), परमेश्वर केशव निकम (४०, रा. चिंचोली ब.) आणि संदीपान विठ्ठल सुरवसे (४७, रा. चिंचोली ब.) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली.
चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक; १५ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST