शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लातूरसाठी कौशल्य विद्यापीठाचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 18:49 IST

महाराष्ट्रात सहा कौशल्य विद्यापीठे स्थापन करण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. त्यातील वैद्यकीय क्षेत्राला पूरक ठरणारे एक कौशल्य विद्यापीठ लातूरमध्ये होईल, अशी ग्वाही पालकमंत्री तथा कौशल्य विकास व अन्न नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

महाराष्ट्रात सहा कौशल्य विद्यापीठे स्थापन करण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. त्यातील वैद्यकीय क्षेत्राला पूरक ठरणारे एक कौशल्य विद्यापीठ लातूरमध्ये होईल, अशी ग्वाही पालकमंत्री तथा कौशल्य विकास व अन्न नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

  • पाणीप्रश्न गंभीर आहे, वॉटर ग्रीड, उजनीवर आपण शब्द दिला. परंतु, परतीचा पाऊस नाही झाल्यास जनतेला दिलासा कसा देणार?

 - वॉटर ग्रीडचा महत्वकांक्षी प्रश्न होणार आहे. त्यात लातूर, उस्मानाबादचा समावेश करण्याची भूमिका आपण मांडली़ उजनीचे पाणी दोन वर्षात नाही मिळाले तर आपली भविष्यातील पदांच्या राजीनाम्याची तयारी आहे़यापूर्वी अनेकांनी घोषणा केल्या मात्र कालावधी सांगितला नाही. मी कालावधी सांगत आहे. त्यानंतर काय करणार हे, ही स्पष्ट करत आहे़ तसेच पुढच्या महिन्यात पाणी पुरवठ्यासाठी टँकर आणि इतर उपाययोजनांबाबत प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

  • रेल्वे बोगी कारखान्यात भरती केंद्रीय पद्धतीने होईल, मग स्थानिकांना रोजगार कसा मिळेल?

- रेल्वे बोगीच्या कारखान्यासाठी जागा राज्यशासनाने दिली आहे. त्यामुळे इथे ७५ टक्के स्थानिकांना संधी द्या, याचा आग्रह आपण सरकारकडे धरू. याबाबत संबंधित मंत्र्यांशी बोलणेही झाले.

  • वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० मुळे मराठवाड्यावर अन्याय होतो. सरकार मात्र भूमिका नीटपणे मांडत नाही?

- हा लातूरसह मराठवाड्याचा प्रश्न आहे. मी स्वत: मुख्यमंत्र्यांना बोललो आहे़ गुणवत्तेवर अन्याय करता येणार नाही. शासन योग्य भूमिका मांडेल. आपण हा प्रश्न न्याय मिळेपर्यंत लावून धरू.

 

  • शैक्षणिक हब असलेल्या लातूरसाठी पाच वर्षात नवे काही मिळालेले नाही?

- असं म्हणता येणार नाही. मुंबईनंतरचे पहिले विभागीय विज्ञान केंद्र लातूरसाठी मंजूर झाले आहे. त्यासाठी १२५ कोटींचा निधी आहे. हे विज्ञान केंद्र पाहण्यासाठी मराठवाड्यातून विद्यार्थी येतील. त्यासाठीची जागाही उपलब्ध करून घेतली आहे़ लातूरची राजकीय संस्कृती जपू़.