सकाळी गावातील जाज्वल्य देवस्थान हनुमान मंदिरात बंधू तानाजी माकणीकर गुरुजी यांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गावातील प्रत्येक घरी गुळ वाटप करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी कोरोना नियमांचे पालन करीत मधुकर माकणीकर यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, चेअरमन दगडू सोळुंके, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी पं.स. सभापती अजित माने, लघुसिंचन विभागाचे अभियंता प्रताप भिंगोले, शेंडगे, श्रीमंत जाधव, प्रल्हाद बाहेती आदी उपस्थित होते. यावेळी तानाजी माकणीकर यांनी मधुकर अण्णा माकणीकर यांनी केलेला संघर्ष सांगितला. मधुकर माकणीकर यांना माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर, माजी मंञी आ. संभाजी पाटील निलंगेकर, भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. (वाणिज्य वार्ता)
मधुकर माकणीकर यांची एकसष्टी साध्या पध्दतीने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST