शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात मायेस पोरखे असलेल्या तीन लेकींच्या बांधल्या रेशीमगाठी

By हरी मोकाशे | Updated: January 6, 2024 20:31 IST

बुधोड्याच्या ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने विवाह सोहळा

लातूर : आई- वडिलांच्या मायेस पोरखे असलेल्या तीन लेकींच्या रेशीमगाठी बुधोड्याच्या ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानने बांधल्या. गेली काही वर्षे येथे राहून शिक्षण, प्रशिक्षण घेतलेल्या या लेकी सासरी जाताना एका डोळ्यात विरहाचे तर दुसऱ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळत होते. वऱ्हाडी मंडळींचेही डोळे पाणवले होते.

औसा तालुक्यातील बुधोडा येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने ४२ वर्षांपासून दिव्यांग पुनर्वसन केंद्र उपक्रम राबविण्यात येत आहे. या केंद्रात समाजातील उपेक्षित व्यक्तीस स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य केेले जाते. एक- दीड वर्षापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या एका अनाथ मुलीचे पालकत्व महिला व बालकल्याण विभागाकडून प्रतिष्ठानने घेतले होते. तिला शिलाई मशीनचे प्रशिक्षण दिले. तसेच काही वर्षांपासून येथे दाखल असलेली अनाथ मूकबधीर त्याचबरोबर आई- वडिलांचे छत्र हरवलेली एकजण स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेत होती.

या तिन्ही मुलींच्या विवाहासाठी संस्थेच्या वतीने उपवर शोधण्यास सुरुवात झाली होती. अखेर त्यास यश आले आणि उपवरांच्या कुटुंबियांशी भेटीगाठी झाली. त्यांच्या सहमतीने शनिवारी दुपारी तिन्ही वधू- वरांच्या विधीवत पध्दतीने रेशीमगाठी बांधण्यात आल्या. यावेळी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, बी.ए. मैंदर्गी, प्राचार्या विना कोपकर, दरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रमुख हरिश्चंद्र सुडे, कमलाकर सावंत, रविचंद्र वंजारे, वैशाली राठोड, शिवशंकर बरबडे आदींनी परिश्रम घेतले.

आतापर्यंत ६० दिव्यांगांचे शुभमंगल...ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने अनाथांना स्वयंरोजगाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर शासनाच्या कुठल्याही मदतीविना तसेच लोकसहभागाविना परंपरेनुसार विवाह लावण्यात येतो. आतापर्यंत ६० दिव्यांगांचे शुभमंगल झाले आहे. ते आनंदाने आपला संसार करीत आहेत.

पुनर्वसनाचा प्रयत्न...समाजातील वंचितांना मदत केल्यास सर्वजण सुखी राहतात. शासनाकडून अल्पवयीन अनाथ बालकांना आधार दिला जातो. मात्र, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. पुनर्वसनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे महत्त्वाचे आहे.- हरिश्चंद्र सुडे.

 

टॅग्स :marriageलग्नlaturलातूर