शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टबॉलमध्ये श्रद्धा जाधवची दमदार कामगिरी; एशियन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 19:50 IST

होमर हिटर श्रद्धा जाधवची 'हिट' गाजली; कोरिया येथे सुरू असलेल्या एशियन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड

- महेश पाळणेलातूर : पावरफुल हिटिंगच्या जोरावर मैदान गाजविणाऱ्या लातूरच्या श्रद्धा संतोष जाधव हिने जिद्दीच्या जोरावर अनेक मैदाने गाजविली आहेत. महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करीत किमया केली आहे. या जोरावर तिची दक्षिण कोरिया येथील इंचोन शहरात सुरू असलेल्या एशियन महिला सॉफ्टबॉल चॅम्पियन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. उदगीर तालुक्यातील करडखेल येथील श्रद्धा जाधवने सॉफ्टबॉल खेळात यानिमित्ताने उच्चांक गाठला आहे. शालेय स्तरापासून तिने सॉफ्टबॉल खेळात लातूरला अनेक वेळा राज्य स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले आहे. जिजामाता कन्या विद्यालय व राजश्री शाहू कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघांनाही तिच्या खेळाच्या जोरावर अनेक वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळाला आहे.

नुकत्याच ओडिशा येथील जगन्नाथपूर येथे झालेल्या महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत तिने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले होते. याच कामगिरीच्या बळावर तिची भारतीय संघात निवड पक्की झाली आहे. तिला दैवशाला जगदाळे, प्रा. अनिरुद्ध बिराजदार, शिवाजी पाटील, नारायण झिपरे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाचे राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गिरीष महाजन, जिल्हा संघटनेचे मोईज शेख, सचिव डी.डी. पाटील यांच्यासह क्रीडाप्रेमींनी कौतुक केले आहे.

उत्कृष्ट फस्ट बेस खेळाडू...सॉफ्टबॉल खेळात फस्ट बेसवर खेळणाऱ्या श्रद्धा जाधवने शालेय जीवनापासूनच चमकदार कामगिरी केली आहे. राज्य, राष्ट्रीय अशा अनेक स्पर्धात आपल्या कामगिरीच्या बळावर संघाला विजय मिळवून दिला आहे. पॉवरफुल हिटिंगसह उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ती राज्यभरात प्रसिद्ध आहे. जवळपास २० राज्य व १२ राष्ट्रीय स्पर्धेत तिने आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे.

दोन वर्षे होती मैदानापासून दूर...शालेय व महाविद्यालयीन स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्रद्धाने शिक्षणासाठी पुण्याकडे धाव घेतली. दोन वर्षे शिक्षणामुळे ती मैदानापासून दूर होती. मात्र, परत सराव करीत तिने आपली लय कायम ठेवली. वरिष्ठ गटात लातूरकडून खेळत तिने हे यश संपादन केले आहे. यवतमाळ येथे झालेल्या राष्ट्रीय सराव शिबिरात तिने आपल्या कौशल्याची छाप सोडली. याच जोरावर तिने भारतीय संघात स्थान मिळविले असून, एशियन स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करेन, असा आत्मविश्वास तिने व्यक्त केला.

टॅग्स :laturलातूर