शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

किल्लारीत शरद पवारांचा शनिवारी कृतज्ञता सोहळा; लातूर, धाराशिवच्या भूकंपग्रस्तांचा पुढाकार

By आशपाक पठाण | Updated: September 27, 2023 22:31 IST

लातूर, धाराशिव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या वतीने शनिवारी किल्लारीच्या क्रांतीकारी मैदानात सकाळी १० वाजता डॉ.शरदचंद्र पवार यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती बुधवारी सक्षणा सलगर यांनी पत्रपरिषदेत दिली.

लातूर : ३० सप्टेंबर १९९३ च्या भूकंपानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन मदत कार्य सुरू केले. त्यांनी केलेल्या मदतीतून उतराई होण्यासाठी लातूर, धाराशिव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या वतीने शनिवारी किल्लारीच्या क्रांतीकारी मैदानात सकाळी १० वाजता डॉ.शरदचंद्र पवार यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती बुधवारी सक्षणा सलगर यांनी पत्रपरिषदेत दिली.

भूकंपात दहा हजारांच्या जवळपास लोकांनी आपले प्राण गमावले. लाखो लोक बेघर झाले, अनेक मुले अनाथ झाली. अनेकांनी आपले आई, वडील, पती, पत्नी, आजी, आजोबा, मुले गमावले. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. अशा परिस्थितीत भूकंपग्रस्त भागातील जनतेला आधार देण्यासाठी अवघ्या दोन तासात तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार धावून आले. भूकंपग्रस्त भागाच्या नवनिर्मितीसाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेतला. जलदगतीने कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यामुळेच या भागात मूलभूत सुविधा मिळाल्या, त्यांच्या त्या कामातून उतराई होण्यासाठी हा कृतज्ञता सोहळा असल्याची माहिती विनाकराव पाटील कवठेकर, सुभाष पवार, अमर बिराजदार यांनी दिली. यावेळी संजय शेटे, राजा मणियार, नानाराव भोसले, बख्तावर बागवान आदींची उपस्थिती होती.

पक्षविरहित कार्यक्रम, मागणे काहीच नाही...किल्लारीत होणारा हा कार्यक्रम पक्षविरहित आहे. कृतज्ञता सोहळ्यात हजारो लोक स्वत:हून उपस्थित राहणार आहेत. भूकंपाच्यावेळी मदत करणाऱ्या शासकीय अधिकारी, संस्थांचे यापूर्वी आभार मानले आहेत. त्यावेळी भूकंपग्रस्तांचे तारणहार शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा राहिला होता. आता या घटनेला ३० वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त सर्व भूकंपग्रस्तांच्या वतीने कृतज्ञता सोहळा आयोजिण्यात आला आहे. या कार्यक्रमात आम्ही कोणतीही मागणी करणार नाही, असे संयोजकांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस