शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: शरद पवार जातीयवादी नाहीत, आठवलेंनी सांगितला स्वत:चा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 13:39 IST

शरद पवार हे जातीयवादी नाहीत हा आपला अनुभव आहे, असे आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगित

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यातील मेळावा सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर घणाघाती आरोप केले होते. राज्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीयवाद वाढल्याचं ते म्हणाले. विशेष म्हणजे ठाण्यातील सभेतही त्यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना पक्षात जातीयवाद असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांन राज ठाकरेंच्या विधानात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. शरद पवार हे जातीयवादी नाहीत हा आपला अनुभव आहे, असे आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मशिदीवरील भोंगे काढण्याची जी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली त्याच्याशी रिपब्लिकन पक्ष सहमत नाही. मंदिरावर भोंगे लावायचे असतील आणि हनुमान चालिसा म्हणायचे असेल तर म्हणा, पण मशिदीवरील भोंगे काढण्याचा आग्रह अजिबात चालणार नाही. संविधानाने तो अधिकार दिला असून महाराष्ट्रात लोकशाही आहे, असेही आठवलेंनी म्हटले.

रिपब्लिकन पक्षातील सर्व गट-तट बंद होऊन एकच पक्ष निर्माण होणे आवश्यक असल्याचेही आठवलेंनी म्हटले. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर पुढे आल्यास तेच या पक्षाचे अध्यक्ष असतील. आपण कोणतेही पद घेऊन काम करू, पण प्रकाश आंबेडकर हे ऐकत नाहीत, असा अनुभवच आठवलेंनी व्यक्त केला. 

राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा

शरद पवार यांच्याकडे घेण्यासारखे अनेक गुण आहेत. मात्र, स्वार्थी राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीयद्वेष महाराष्ट्रात पसरला, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. प्रत्येक जातीचा माणूस शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी लढला. शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचणे महत्त्वाचे आहे. मात्र, तो कुणी लिहिला, यावरून राजकारण केले गेले. जाती-पातीत महाराष्ट्र अडकला गेला. महाराष्ट्राला कुणीही हरवू शकत नाही, मात्र राज्यातील जातीचे राजकारणच आपल्याला हरवेल, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच अनेक संघटना स्थापन झाल्या.  महाराष्ट्रात जाती होत्याच पण राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद महाराष्ट्रात आला. जातीयद्वेष पसरला, असा मोठा आरोप राज ठाकरे यांनी केला. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरे