शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामासाठी लोदग्याच्या सरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनीच घेतले ताब्यात

By आशपाक पठाण | Updated: March 5, 2024 18:40 IST

लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना 

लातूर :महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आलेल्या लातूर ते निटूर मोड, औराद शहजानी मार्गावरील रस्त्याचे काम अर्धवट व अनेक ठिकाणी निकृष्ट करण्यात आल्याचा आरोप करीत लोदगा ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग गोमारे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्यांना ताब्यात घेतले.

लातूर ते निटूर, औराद शहाजानी राज्य मार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. काही ठिकाणी केलेले काम अत्यंत दर्जाहीन झाले आहे. यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. या मार्गाचे काम करणारे कंत्राटदार व अभियंता यांच्यावर मनुष्यवधानाचे गुन्हे दाखल करून कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाका, अशी मागणी करीत सरपंच पांडुरंग गोमारे यांनी जवळपास आठ दिवस उपोषण केले होते. त्यांना ८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे कार्यकारी अभियंता यांनी लेखी पत्र देऊ दीड महिन्यात काम सुरू करून उर्वरित कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. तसेच औसा तहसीलदारांनीही आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले होते. दीड महिना लोटला, आता विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप गोमारे यांनी मंगळवारी केला आहे.

साध्या वेशातील पोलिसांनी घेतले ताब्यात...सरपंच पांडुरंग गोमारे यांनी १ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लेखी आश्वासनाची पुर्तता न केल्यास ५ मार्च रोजी आत्मदहन करणार असल्याचे म्हटले होते. मंगळवारी दुपारी १२ वजाण्याच्या सुमारास एका वाहनातून उतरून डिझेलचा कॅन अंगावर ओतून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या गोमोर यांना साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह एमआयडीसी पोलिस होते.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद