शारदा स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
लातूर : केंद्रीय बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी सीबीएसई बोर्डाच्या २०१९ - २०च्या परीक्षेत येथील शारदा इंटरनॅशनल स्कूलच्या प्रणाली शिंदे व दिशा निनगुरकर या विद्यार्थिनींनी गणित विषयात देशात पहिल्या ०.१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले. शाळेचे प्रशासक एल. एम. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, प्राचार्य कैलास जाधव, वैशाली गिरवलकर, शीला शेळके, विलास गायकवाड, रेहमत सय्यद, सायली मेनकुदळे आदींनी या विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.
वृंदावन कॉलनीत ‘एक घर दोन झाड’ उपक्रम
लातूर : येथील वसुंधरा प्रतिष्ठान, वृंदावन चॅरिटेबल ट्रस्ट आणि लातूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृंदावन कॉलनी भागात ‘एक घर दोन झाड’ उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नगरसेवक अनंत गायकवाड, शोभाताई पाटील, मयुरा शिंदेकर, रवींद्रनाथ मल्लिनाथ महाराज, ललिता चिंते, बसवराज स्वामी, अमिता देशपांडे, राजेश भांडे, प्रा. योगेश शर्मा, अजित चिखलीकर, उमाकांत मुंडलिक, रामेश्वर बावळे, संजय कुलकर्णी, गजानन सुपेकर, माधव पिटले, विश्वजित भारती, हेमंत भावसार, जयदेव बिडवे, मधुकर सोनवणे, बाळासाहेब मसुरे, रमेश विश्वकर्मा, नंदकुमार धानुरे, प्रकाश काळे, धीरज राजमाने, दत्तात्रय आनंदगावकर, उदय पाटील, सिद्राम चाकोते, सिद्धेश्वर कुठार, बालाजी लकडे, भीमाशंकर सिध्देश्वरे, वीरभद्र स्वामी, शिवाजी तांबाळे, बाळासाहेब रेड्डी, डॉ. संदीप घोणशीकार, प्रदीप पाटील, आदी उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात दीक्षांत समारंभ
लातूर : येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय व स्वारातीम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ जुलै रोजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शिवराज पाटील-चाकूरकर, डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. यशवंत वळवी, डॉ. भास्कर नल्ला रेड्डी, प्रा. डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा. डॉ. शिवप्रसाद डोंगरे, प्रा. डॉ. संजय गवई, प्रा. टी. घनश्याम, प्रा. आशिष क्षीरसागर यांनी केले आहे.
दयानंद कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून दयानंद कला महाविद्यालय येथील प्रिया बाबुराव साळुंके व तानाजी सर्जेराव बडे या विद्यार्थ्यांची ‘उत्कृष्ट स्वयंसेवक’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, सचिव सुरेश जैन, संजय बोरा, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. सुभाष कदम, डॉ. सुनीता सांगोले, डॉ. मच्छिंद्र खंडागळे, डॉ. संतोष पाटील, डॉ. अंजली जोशी, डॉ. शिवकुमार राऊतराव, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. संदीप जगदाळे, प्रा. विलास कोमटवाड, नवनाथ भालेराव, आदींनी कौतुक केले आहे.